Kartiki Ekadashi Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Pandharpur news : आषाढी यात्रेनंतर कार्तिकीला देखील यात्रा भरत असते. १२ नोव्हेंबरला पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी एकादशीनंतर येणारी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात यात्रा भारत असते. या एकादशीला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिक यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठल दर्शनासाठी तीन किलोमीटर पर्यंत रांग गेली आहे. 

आषाढी यात्रेनंतर (Kartiki Ekadashi) कार्तिकीला देखील यात्रा भरत असते. १२ नोव्हेंबरला पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. पंढरपुरात (Pandharpur) सध्या लाखो भाविक दाखल झाले असून विठू नामाच्या गजराने पंढरी नगरी अवघे दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी देखील भाविकांची गर्दी होत आहे. आतापासूनच भाविक दर्शनाच्या रांगेत लागले असून भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा करण्यात आलेली आहे.  

तीन किलोमीटरपर्यंत रांग 

यंदाच्या कार्तिकी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक कार्तिकीसाठी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, चहा, नाश्ता, जेवण आधी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना उकाड्याचा त्रास होऊ नये; यासाठी ठिकठिकाणी पंखे कुलरची व्यवस्था केलेली आहे. गोपाळपूर रोडवरील जवळपास सहा पत्र शेड भाविकांनी भरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT