Ashadhi Wari 2025  Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रेसाठी १३ लाख बुंदी लाडूचा प्रसाद; मंदिर समितीची जोरदार तयारी

Pandharpur News : लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनाला येतात. यंदाची आषाढी यात्रा आठवडाभरावर आली असून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहे. भाविकांसाठीची सर्व सुविधा मंदिर समितीकडून करण्यात आली

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. त्यानुसार यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान १२ ते १३ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. यामुळे विठूरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून लाडू प्रसाद उपलब्ध करुन दिला आहे. याकरिता मंदिर समितीने १३ लाख ५० हजार बुंदी लाडू व ६० हजार राजगिरा लाडू प्रसादाची निर्मिती केली आहे.

वर्षभर आतुरतेने वारकरी मंडळी आषाढी वारीची वाट पाहत असतात. राज्यभरातून प्रमुख वाऱ्यांसह वेगवेगळ्या भागातून पायी दिंडी वारी पंढरपुरात दाखल होत असतात. यामुळे आषाढी एकादशीला पंढपुरात वैष्णवांचा मेळावा जमत असतो. लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनाला येत असतात. यंदाची आषाढी यात्रा आठवडाभरावर आली असून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहे. या भाविकांसाठीची सर्व सुविधा मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. 

लाडू प्रसादाची अल्प दरात विक्री
विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर भाविक देवाचा प्रसाद खरेदी करुन घरी घेऊन जातात. मंदिर समितीकडून भाविकांना बुंदी लाडू प्रसादाची अल्पदरात विक्री केली जाते. या लाडू प्रसादाला भाविकांनाकडून मोठी मागणी असते. मागणीनुसार यंदा भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा १३ लाख बुंदीचे लादून असणार आहेत. लाडू प्रसाद निर्मितीची तयारी सुरु आहे.

विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या या प्रकाशाने विठ्ठल मंदिर व परिसर उजळून निघाला आहे. आषाढी यात्रेच्या सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. या निमित्ताने विठ्ठल मंदिरावरील शिखर, संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार ,व्हीआयपी गेट, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, तुकाराम भवनासह मंदिरातील विठ्ठल सभा मंडप यासह विविध ठिकाणी विविध रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Galaxy : Samsung Galaxy Z Flod7 & Flip7 लॉन्च, जाणून घ्या किंमत

Shocking: प्रसिद्ध व्यावसायिकानं गोळ्या झाडून स्वत:ला संपवलं; फेसबुक लाईव्हवर सांगितलं आत्महत्येचं कारण

Maharashtra Live News Update : मालेगावच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; विविध संघटनांचे बेमुदत उपोषण सुरू

Sanjay Shirsat : आधी म्हणाले श्रीकांत शिंदेंना इनकम टॅक्सनं नोटीस पाठवली, गदारोळ होताच शिरसाटांचा यू टर्न

Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या; पुण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT