
सोशल मीडियावर अनेकदा पाळीव प्राण्यांचे घरातील सदस्यांप्रमाणे लाड पुरवले जाणारे व्हिडिओ आपण पाहतो. एखाद्या गरोदर स्त्रीचे जेवढे लाड घरी तिचे घरचे पुरवतात त्याचप्रमाणे आता मांजर, कुत्रा यांसारख्या पाळीव प्राण्यांचे प्रजननाच्या वेळेस लाड पुरवले जातात. त्यांच्या गरोदरपणाच्या काळात त्यांना हवं नको असलेले सगळे खाद्य पदार्थ आणून दिले जातात.पण तुम्ही कधी गाईच्या डोहाळे जेवणाबद्दल ऐकलं आहे का? धाराशिव मधल्या शेतकऱ्याने चक्क गाईच्या बाळंपणात तिचे डोहाळे जेवण केले आहे.
धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतकरी अनिल सोनवणे यांनी आपल्या गाईचे अनोख्या पद्धतीने लाड पुरवले.गाईला केवळ उपयुक्त पशु म्हणून न पाहता, कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या गाईसाठी 'डोहाळे जेवण' आयोजित करून अनोखा उपक्रम राबवला. सोनावणे यांच्या गाईचा नववा महिना सुरु असून त्यानिमित्ताने पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवणाचे आयोजन करण्यात आले.
गाईच्या डोहाळे जेवणाला सोनावणे यांनी फुलांची सजावट केली. ढोल-ताशांच्या गजरात गाईची पूजा केली आणि नैवेद्याबरोबर तिची ओटी भरण्याचे आयोजन करण्यात आले.गाईला हार-फुले घालून तिचे औक्षण करण्यात आले आणि खास तिच्यासाठी फळं, गाजर, खीर, गुळ-चारा यांचा समावेश असलेले तिला आवडेल असं थाटातलं जेवण तयार करण्यात आलं.
एकीकडे पाळीव प्राण्यांचे द्वेष करणारी मंडळी आणि एदुसरीकडे या शेतकऱ्याने केलेल्या गाईच्या सेवा-शुश्रूषेतील या अनोख्या उपक्रमाला परिसरातील नागरिक आणि शेजारी मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिली. अनेकांनी या शेतकऱ्याच्या पशुप्रेमाचं कौतुक केलं आहे. तसेच या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.