Shivsainik
Shivsainik भारत नागणे
महाराष्ट्र

१० वर्षानंतर शिवसैनिकाने घातली पायात चप्पल; बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर केला होता 'हा' पण

भारत नागणे

पंढरपूर: सांगोला तालुक्यातील महूद येथील शिवसैनिक (Shivsainik) शंकर मेटकरी यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही. तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा पण केला होता. तब्बल दहा वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चप्पल घालून पण पूर्ण केला‌.

2019 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री झालेआणि शंकर मेटकरी यांचा पण पूर्ण झाला. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चप्पल घालण्याचा मुहूर्त पुढं जात होता.

पाहा व्हिडीओ -

अशातच उद्धव ठाकरे यांचा बुधवारी वाढदिवस होता या निमित्ताने शिवसैनिक शंकर मेटकरी यांना मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चप्पल घालण्यास दिली. दहा वर्षांनंतर आणवानी पायांना चप्पल मिळाली‌. शंकर मेटकरी हे 2001 पासून सांगोला तालुक्यात शिवसैनिक म्हणून काम करतात.

बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर अपार प्रेम आणि श्रद्धा आहे. याच भावनेतून त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी चप्पल न घालण्याचा पण केला होता. सत्तेच्या मागे धावणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते पाहिले असतील पण निष्ठा आणि श्रद्धा ठेवणारे शिवसैनिक आजही ग्रामीण भागात असल्याचे शंकर मेटकरी यांनी सिद्ध केलं असल्याचं शिवसैनिकांकडून बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का?; शरद पवारांचे कट्टर समर्थक भाजपच्या वाटेवर

Maharashtra Politics: मराठी उमेदवार मिळत नसेल तर मुंबईतल्या 3 जागा बिनविरोध करा; शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची फडणवीसांना पत्राद्वारे मागणी

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी : नारायण राणे

Today's Marathi News Live : बोरिवलीत रुग्णालयाला आग, काहीजण जखमी झाल्याची माहिती

UP News: धनंजय सिंहला इलाहाबाद हायकोर्टचा दणका; अपहरण प्रकरणात शिक्षा कायम, खासदारकीचं स्वप्न भंगलं

SCROLL FOR NEXT