Maharashtra Politics 2024 : माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का?; शरद पवारांचे कट्टर समर्थक भाजपच्या वाटेवर

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सकाळ पासून चर्चा आहे. कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली असून बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

लोकसभा निवडणुकां जाहीर झाल्यापासून माढा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोड पहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना माढ्यात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सकाळ पासून चर्चा आहे. कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली असून बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने कारवाई केल्यानंतर अभिजित पाटील गट अस्वस्थ आहे. शुक्रवारी शरद पवार माढ्याच्या दौऱ्यावर असतानाच विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अभिजीत पाटील शरद पवार गट सोडण्याची जोरदार चर्चा आहे. अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश केला तर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

विठ्ठल साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० काेटी रुपये थकीत आहेत. या प्रकरणी बॅंकेच्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हाही दाखल आहे. त्या प्रकरणात पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : ...तर आम्ही मदत केली असती; हिना गावित यांच्या भेटनंतरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची नाराजी कायम

दरम्यान, जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी शुक्रवारी रात्री संचालक मंडळ आणि विश्वासून सहकाऱ्यांची बैठक बोलावली हेाती. त्या बैठकीत निर्णयाचे स्वातंत्र अभिजित पाटील यांना देण्यात आले होते. तत्पूर्वी अभिजित पाटील यांनी सूत्रे हलवत कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही, त्यामुळे अभिजित पाटील आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com