UP News: धनंजय सिंहला इलाहाबाद हायकोर्टचा दणका; अपहरण प्रकरणात शिक्षा कायम, खासदारकीचं स्वप्न भंगलं

Dhananjay Singh Former Jaunpur Mp : उत्तर प्रदेशातील बाहुबली धनंजय सिंगला अलाहाबाद हायकोर्टाने मोठा दणका दिलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धनंजय सिंह यांना आता लोकसभा निवडणूक लढवता येणार नाहीये.
Dhananjay Singh Former Jaunpur Mp
Dhananjay Singh Former Jaunpur Mpgoogle

Dhananjay Singh Former Jaunpur Mp Allahabad High Court :

माजी खासदार आणि धनंजय सिंह यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून झटका बसलाय. धनंजय सिंह यांना आता लोकसभा निवडणूक लढवता येणार नाहीये. नमामी गंगे प्रकल्प व्यवस्थापकाच्या अपहरण प्रकरणात जौनपूरच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार धनंजय सिंह यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावलीय होती. ही शिक्षा अलाहाबाद न्यायालयाने कायम ठेवलीय.

मात्र, याप्रकरणी माजी खासदार धनंजय सिंह यांचा जामिनावर सुटका करण्याचा अर्ज न्यायालयाने मान्य केलाय. न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी शनिवारी हा आदेश दिला. याआधी शनिवारी सकाळी ८ वाजता धनंजयला जौनपूर जिल्हा कारागृहातून बरेली कारागृहात हलवण्यात आले. धनंजय हा ६ मार्चपासून जौनपूर जिल्हा कारागृहात बंद आहेत.

पूर्वांचलचे बाहुबली माजी खासदार धनंजय सिंह यांनी गेल्या महिन्यात जौनपूरच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या ७ वर्षांच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. धनंजय सिंह यांच्यावर 'नमामि गंगे प्रोजेक्ट'च्या व्यवस्थापकाचा अपहरण केल्याचा आरोप आहे. दरम्यान बुधवारी धनंजय सिंह यांच्या वकीलांनी धनंजय सिंह यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अशी परवानगी मागितली होती.

खटल्यादरम्यान धनंजय सिंह जामिनावर होते, त्यांनी जामिनाचा गैरवापर केला नाही आणि त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती, त्यामुळे त्याची शिक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात यावी, असं वकील म्हणाले होते.

Dhananjay Singh Former Jaunpur Mp
Delhi Liquor Policy Case: ईडीकडून दाखल केलेले साक्षीदार भाजपशी संबंधित; SC मध्ये केजरीवालांनी दिलं उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com