Narayan Rane Vs Uddhav Thackeray: बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी : नारायण राणे

Ratnagiri Sindhudurg Constituency : रत्नागिरी सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभा, बैठका, मेळावे सुरु आहेत.
narayan rane says balasaheb thackeray would love me rather than uddhav thackeray
narayan rane says balasaheb thackeray would love me rather than uddhav thackeraySaam Digital

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा एकही खासदार निवडून येणार नाही असा दावा नारायण राणे (narayan rane) यांनी आज केला. कुडाळ माणगाव खोऱ्यात त्यांचा राणेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात माणगाव येथील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणेंच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये प्रवेश केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

रत्नागिरी सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभा, बैठका, मेळावे सुरु आहेत. कुडाळ माणगाव खोऱ्यातील सभेत बाेलताना नारायण राणे म्हणाले शिवसेनेच्या स्थापनेपासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मला अनेक पद दिली. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे काही अधिकार दिले. त्यानंतर काही मुद्यावरून उद्धवशी माझ पटले नाही.

narayan rane says balasaheb thackeray would love me rather than uddhav thackeray
धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, राजू शेट्टींचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन, Video

शिवसेनेसाठी जीवाची पर्वा केली नाही : नारायण राणे

बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं हे उद्धव ठाकरे याची पोटदुखी होती. रश्मी ठाकरे यांनी उद्धवला सांगितले, जोपर्यंत राणे शिवसेनेत आहे तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही. शिवसेनेसाठी आम्ही केव्हा जीवाची पर्वा केली नाही, ना कुटुंबाची पर्वा केली. बाळासाहेब जीवापाड प्रेम करायचे. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेला नाही मला मुख्यमंत्री केलं. बाळासाहेब मला नेहमी म्हणायचे नारायण आपल्याला मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी काम करायचं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही

उद्धव आता ज्याप्रकारे बोलतात ते राजकीय माणसाचे बोलणे नाही. देशाच्या पंतप्रधानाना अक्षरशः शिव्या घालतो. काय अवस्था होईल तुमची असं नारायण राणे उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही असा दावा देखील नारायण राणे यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

narayan rane says balasaheb thackeray would love me rather than uddhav thackeray
Kalyan Crime News : तब्बल 150 सीसीटीव्हीची तपासणी, 46 क्रमांक पाहताच पाेलिसांनी महागड्या बाईक चाेरणा-याला केलं जेरबंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com