धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, राजू शेट्टींचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन, Video

Raju Shetti On Onion Export Decision : जसं लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागली. तसं सरकार घाबरल्याचे शेट्टींनी नमूद केले.
raju shetti welcomes onion export decision and criticize central government
raju shetti welcomes onion export decision and criticize central governmentSaam Digital
Published On

Sangli :

शेतकऱ्यांनी डोळे वटरल्यानंतर सरकार घाबरून गेलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे. डोळे वटरल्यानंतर सरकार निर्णय घेत असेल तर त्यांचे उमेदवार पाडा तरच त्यांना कांदा उत्पादका शेतकऱ्यांची ताकद कळेल असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी कांदा निर्यात बंदी हटविण्याच्या निर्णयावर मत केले. (Maharashtra News)

राजू शेट्टी म्हणाले गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करत हाेते. शेतकरी रस्त्यावर उतरत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हते. जसं लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागली.

raju shetti welcomes onion export decision and criticize central government
छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

त्यामुळे सरकार जागे झाले. सरकराने कांदा निर्यातीस परवानगी दिली. याचे आम्ही स्वागत करतो पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे. त्याच्यावरचे बंधन काढून टाकावं अशी आमची मागणी असल्याचे शेट्टींनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

raju shetti welcomes onion export decision and criticize central government
Sangli BJP : संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com