Sangli BJP : संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती, Video

Sangli Lok Sabha Election 2024 : भाजप नगरसेवक, नेत्यांचा विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये वाढत्या सहभागामुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा सांगलीत आहे.
bjp suspends jat taluka bjp president pramod sawant
bjp suspends jat taluka bjp president pramod sawantSaam Digital

Sangli Constituency :

सांगली लाेकसभा मतदारसंघात भाजपने पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत जत तालुका भाजप अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याबाबतचे पत्र साम टीव्हीची हाती लागले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जत तालुका भाजप अध्यक्ष प्रमोद सावंत हे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील (vishal patil sangli) यांचा प्रचार करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापर्यंत सावंत यांच्या तक्रारी गेल्या. त्यानंतर पाटील यांनी सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

bjp suspends jat taluka bjp president pramod sawant
Madha Constituency : शहाजी बापूंची सुपारी फुटली मुंबईत अन् हळद लागली गुवाहाटीत, जानकरांचं उत्तर, Video

भाजप नगरसेवक , नेत्यांचा विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये वाढत्या सहभागामुळे भाजपची वाढली डोकेदुखी वाढल्याचे बाेलले जात आहे. दरम्यान या कारवाईवर बाेलताना प्रमाेद सावंत आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी भाजपच्या वेगवेगवेगळ्या मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देणार आहेत असे सांगितले. आधी माजीआमदार, त्यानंतर चार नगरसेवक आणि आता तालुका अध्यक्ष संजयकाका पाटलांच्या विरोधात मैदानात उतरल्याचे चित्र मतदारसंघात आहे.

Edited By : Siddharth Latkar

bjp suspends jat taluka bjp president pramod sawant
Vinayak Raut Vs Narayan Rane: पक्षप्रमुखांचा रस्ता रोखणारे अजून जन्माला आलेला नाही; विनायक राऊत नारायण राणेंवर बरसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com