Kartiki Ekadashi Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Yatra : विठुरायाचे घेता येणार २४ तास दर्शन; कार्तिकी एकादशीनिमित्ताने मंदिर समितीचा निर्णय

Pandharpur News : आगामी कार्तिकी एकादशीच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पंढरपूरमध्ये झाली. यात मंदिर २४ तास खुले ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. यात आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असते. आता या निमित्ताने २६ऑक्टोबरपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विठ्ठल मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. 

पंढरपुरात आषाढी यात्रेला वारकरी व भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळत असते. यानंतर कार्तिकी यात्रेला महत्व असून या यात्रेला देखील भाविक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान येत्या २ नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रेचा महासोहळा संपन्न होणार आहे. यासंदर्भात काल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पंढरपूर आज संपन्न झाली. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीत याबाबत माहिती दिली.

भाविकांना २४ तास दर्शनाचा लाभ 

कार्तिकी एकादशीला देखील लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे आल्यानंतर तात्काळ दर्शनाचा लाभ भाविकांना मिळावा; यासाठी कार्तिकी एकादशीच्या आठ दिवस आधीपासून म्हणजे २ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन सुरु करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी सोयीचे होणार आहे. 

महापूजेसाठी उपमुख्यमंत्री कोण?

कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. परंतु कार्तिकीच्या महापूजेला दोन्ही पैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचं; हे मात्र अद्याप निश्चित नाही. विधी व न्याय खात्याचा सल्ल्यानुसार दोन्हीपैकी एका उपमुख्यमंत्र्यांना महापूजेचे निमंत्रण दिले जाणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाली, तर मात्र उपमुख्यमंत्र्यांऐवजी विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना कार्तिकीच्या शासकीय महापूजेचा मान मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT