विशाल शिंदे
परभणी : आठ दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार बघायला मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पहाटे झालेल्या मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांसह ग्रामीण भागातील शेत शिवारही पाण्याखाली गेली आहेत. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे.
दोन आठवडे सतत पाऊस राहिल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. दरम्यान मागील आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे पूरस्थिती ओसरली होती. तर शेतकऱ्यांची देखील पीक काढणीची लगबग पाहण्यास मिळत होती. मात्र परभणी जिल्ह्यात पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.
शहरातील अनेक घरात पाणी, संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान
मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर शहरातील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. यामुळे अनेक घरात पाणी गेले आहे. परभणी शहरातील संत गाडगेबाबानगर, साईबाबानगर, अक्षदा मंगल कार्यालय परिसर आधी नगरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. गाडगेबाबा नगरमध्ये महानगरपालिका पाणी काढण्याचे प्रयत्न करत आहे.
शेतकऱ्यांची काढून ठेवलेले सोयाबीन वाचवण्यासाठी धडपड
सतत पडत असलेल्या पावसामुळे वाचलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी काढले खरे मात्र रात्रीच्या पावसाने तेही भिजले. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकरी पांडुरंग पंडितराव भिसे यांच्या शेतात काल दिवसभर सोयाबीन कापून मळणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन काढलं रात्री शेतात ठेवलं होतं. पहाटे मुसळधार पाऊस झाला आणि हे सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क मांडी एवढ्या पाण्यातून सोयाबीनचे पोते बाहेर काढले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.