Pandharpur Kartiki Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Kartiki Yatra: पालखी मार्गावरील १०८ रूग्णवाहिका नाॅट रिचेबल; रुग्णांसाठी ठरतेय अडचण

Pandharpur News : पालखी मार्गावर मागील दोन दिवसांत पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनांना अपघात झाला होता

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्ताने भाविक येऊ लागले आहेत. दरम्यान पालखी मार्गावर काही घटना घडल्यास प्राथमिक उपचारासाठी रुग्णवाहिका उभ्या असतात. परंतु ऐन कार्तिकी यात्रेतच (Kartiki Yatra) आरोग्य विभागाच्या १०८ रूग्णवाहिका नाॅट रिचेबल असल्याचा प्रकार पालखी मार्गावर समोर आला आहे. याबाबत (Pandharpur) माळशिरस येथील मनसे नगरसेविका रेश्मा टेळे यांनी तक्रार केली आहे. (Maharashtra News)

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविक खासगी वाहनाने पंढरपूरला येतात. या दरम्यान पंढरपूर- पुणे या पालखी महामार्गावर सतत अपघात होत असतात. यावेळी अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने १०८ रूग्णवाहिकांची सोय केली आहे. माळशिरस तालुक्यात पालखी मार्गावर मागील दोन दिवसांत पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनांना अपघात झाला होता. यावेळी स्थानिकांनी १०८ नंबरवर फोन लावले असता नाॅट रिचेबल येत असल्याने अपघातग्रस्त रूग्णांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु अपघात झाल्यानंतर १०८ नंबरला फोन केला असता नाॅट रिचेबल येत असल्याने रूग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्य विभागाने यांची दखल घेवून तातडीने रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावा; अशी मागणी प्रवाशी‌ भाविकां मधून केली जात आहे. दरम्यान इतर रूग्णांना दवाखान्यात पोचवण्यासाठी रूग्णवाहिका गेल्यानंतर परत माघारी येण्यास उशीर होतो. असा खुलासा रूग्णवाहिका व्यवस्थापक डाॅ.अनिल काळे यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; 'मना’चे श्लोक'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Gautam Gambhir: 1 रूपयात पोटभर जेवण! टीम इंडियाच्या गुरूचं कौतुक करावं तितकं कमी, Video

Marathwada : १५०० कोटींपेक्षा अधिक निधी, पण शेतकऱ्यांना KYC नंतरच मदत, पुरानंतर पुराव्याचं संकट? | VIDEO

Marathi Actor : मराठी अभिनेत्यानं परदेशी गर्लफ्रेंडसह गुपचुप केलं लग्न, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

SCROLL FOR NEXT