BJP MLA Samadhan Awatade  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur | पंढरपुरात भाजपला सर्वात मोठा धक्का; 'दामाजी'च्या आखाड्यात विरोधकांची बाजी

आमदारआवताडे गटाला २१ पैकी फक्त २ जागेवर समाधान मानावे लागले.

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार समाधान आवताडेंसह त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. आमदार आवताडे यांच्या विरोधात आलेल्या समविचारी गटाने कारखान्यावर सत्ता मिळविली आहे‌. आमदार आवताडे गटाला २१ पैकी फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. (BJP MLA Samadhan Awatade Latest News)

अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काल म्हणजेच गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीपासूनच समविचाराचे उमेदवार आघाडीवर राहिले. रात्री उशिरा मतमोजणी संपली त्यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार समाधान आवताडे, उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांच्यासह जवळपास 10 संचालकांनाचा पराभव झाला आहे.

समविचारी गटातून तानाजी खरात, शिवानंद पाटील , भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष गोपाळ भगरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार, तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील , भारत बेदरे , माजी सभापती निर्मला काकडे , लता कोळेकर , राजेद्र पाटील , महादेव लुगडे, माजी संचालक बसवराज पाटील , भिवा दौलतडे , मुरलीधर दत्तू , दयानंद सोनगे , रेवणसिद्ध लिगाडे, तानाजी कांबळे, हे विजयी झाले. निकाल जाहीर होताच समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT