मोठी बातमी! मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला खिंडार, १८ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
uddhav Thackeray And eknath Shinde
uddhav Thackeray And eknath Shindesaam tv
Published On

मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे यांना पाठिंबा दिला. भाजपच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra Government) सत्तेच्या चावी हाती घेतल्या. मात्र, आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (bmc election) एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखण्यात सुरुवात केलीय.'मिशन मुंबई'सुरू करून शिंदे यांनी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. यापूर्वीही मुंबई, ठाणे विभागातील आजी माजी नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मीरा- भाईंदरमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार आहे. शिवसेनेचे मीरा भाईंदर महापालिकेतील (mira bhayandar municipal corporation) विद्यमान १८ नगरसेवक तसेच शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहेत.

uddhav Thackeray And eknath Shinde
अखेर ठरलं! सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील लीला हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मीरा भाईंदर शहरात गेल्या १३ वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढवण्यात आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक ,शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार असून शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com