मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची (Eknath Shinde) आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यातील पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील पेट्रोल डिझेवर (Petrol-Diesel) लावण्यात आलेल्या करामध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची तसेच नगरपंचायत नगराध्यक्षाची थेट जनतेमधून निवड होणार आहे. (CM Eknath Shinde Latest News)
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करून राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेमधून निवड केली जाणार आहे. सरपंच पदाबरोबरच नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारनं थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. (Sarpanch Election Latest News)
पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त
राज्यात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत, तर डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. व्हॅट कपातीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यात इंधन दर प्रति लीटर पाच रुपयांनी स्वस्त झाले असून डिझेल तीन रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.