मोठी बातमी! राज्यात पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

Petrol Diesel Prices In Maharashtra : एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.
Petrol Rate In Maharashtra, Latest News On Petrol And Diesel Prices, Maharashtra Fuel Price News
Petrol Rate In Maharashtra, Latest News On Petrol And Diesel Prices, Maharashtra Fuel Price NewsSaam Tv

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोलचे (Petrol) दर ५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत, तर डिझेलचे (Diesel) दर ३ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. व्हॅट कपातीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यात इंधन दर प्रति लीटर पाच रुपयांनी स्वस्त झाले असून डिझेल तीन रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Fuel Price News)

हे देखील पाहा -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ व २२ मे २०२२ रोजी पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यांनी राज्य शासनालादेखील कर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करुन इंधनाचे दर कमी केले होते. मात्र राज्यात इंधनाचे दर कमी करण्यात आले नव्हते. आपल्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे आजपासून पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे." असे एकनाथ शिंदे यांनी दरकपातीचा निर्णय जाहीर करताना सांगितले.

Petrol Rate In Maharashtra, Latest News On Petrol And Diesel Prices, Maharashtra Fuel Price News
महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासारखी; अतुल लोंढेंची मुख्यमंत्र्यांसह भाजपवर बोचरी टीका

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेतील विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेल दर आणखी कमी करण्याची घोषणा केली होती. मे महिन्यात केंद्र सरकारने इंधन दराचा भडका उडाल्यानंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने इंधनावरील काही करांमध्ये कपात केली होती. केंद्र सरकारने इंधन दर कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी मागणी सातत्याने त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला. त्याऐवजी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढवलेल्या करात कपात करावी अशी मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटी परतावाही दिला नसल्याचा मुद्दा महाविकास आघाडीकडून अधोरेखित करण्यात आला होता. मात्र, आता राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आल्यानं केंद्र सरकारच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इंधनाच्या दरांमध्ये कपात करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest News On Petrol And Diesel Prices Maharashtra)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com