Pandharpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Crime News : एकतर्फी प्रेमासाठी मैत्रिणींचा दबाव; तणावातून विद्यार्थीनीने उचललं टोकाचं पाऊल

Pandharpur News : रुपालीचे आई-वडील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे दिवसभर रूपाली‌ घरी एकटीच असायची.

भरत नागणे

Pandharpur Crime News : पंढरपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आणि प्रेमासाठी सातत्याने आग्रह धरणाऱ्या मैत्रिणींच्या दबावाला बळी पडून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. जीवाभावाच्या मैत्रिणींनीच प्रेमासाठी दबाव टाकल्याची गंभीर बाब पोलिस तपासात उघडकीस येताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

रुपाली बकवाड असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police)  संशयित आरोपी वैजीनाथ पवार याच्यासह तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनिल नगर भागात राहणारी रुपाली ही नववी मध्ये शिकत होती.

रुपालीचे आई-वडील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे दिवसभर रूपाली‌ घरी एकटीच असायची. याच गोष्टीचा गैरफायदा घेत परिसरात राहणारा संशयित आरोपी (Crime News) वैजीनाथ सुनील पवार (वय १९) हा एकतर्फी प्रेमातून रुपालीच्या मागे लागला होता.

मात्र, रुपालीने त्याच्या प्रेमाला अनेक वेळा विरोध केला. दरम्यान आरोपीने तिच्या तीन मैत्रिणींना पुढे करून रुपालीवर प्रेमासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली. ही बाब रुपालीने आपल्या आई वडिलांना सांगितली होती. तरीही आरोपी वैजीनाथ याने मयत रूपालीस त्रास देणे सुरूच ठेवले होते.

दरम्यान, रुपालीच्या तीन मैत्रीणींने सुद्धा तिच्यावर प्रेमासाठी दबाव टाकला. वैजीनाथ सोबत प्रेम कर नाहीतर तो घरी (Pandharpur News) येवून तुझ्या आई-वडिलांना संपवून टाकेल, अशी धमकीही मैत्रीणींनी रुपालीला दिली. यातूनच रुपालीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

SCROLL FOR NEXT