Pandharpur Crime भारत नागणे
महाराष्ट्र

Pandharpur Crime: वेळापुरात महिंद्रा एक्सवी गाडीवर गोळीबार; तरुण थोडक्यात बचावला...

गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी वेळापूर पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. गोळीबारानंतर वेळापूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत नागणे

पंढरपूर - मोटारसायकल वरून ‌आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेवून एका महिंद्रा एक्सवी गाडीव‌र गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील प्रविण शशिकांत सावंत हा तरूण थोडक्यात बचावला आहे.ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला (Sangola) रस्त्यावर वेळापूर जवळ घडली. या प्रकरणी वेळापूर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

प्रविण सावंत हे रात्री महिंद्रा एक्सवी गाडीतून कोळेगाव या आपल्या गावी निघाले होते. त्याची गाडी वेळापूर येथील भाग्यश्री ज्वेलर्स जवळ आली असता समोरून मोटारसायकल वरून ‌आलेल्या दोघा अज्ञातांनी गाडीवर गोळीबार केला. एक गोळी गाडीच्या मागच्या बाजूला लागली तर दुसरी हवेत झाडली. त्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या गोळीबार हल्यामध्ये प्रवीण सावंत हा तरूण थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शिवपुजे यांनी ही रात्रीच घटनास्थळीची पाहणी केली. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी वेळापूर पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. गोळीबारानंतर वेळापूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care Drink: थंडीत नक्की प्या हे हेल्दी ड्रिंक, होणार नाहीत सर्दी खोकला ताप सारखे आजार

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या

Winter Picnic Travel : कडाक्याच्या थंडीत मुंबईतील या ठिकाणांना द्या भेट, विकेंडला करा खास कुटुंबासोबत पिकनीक प्लान

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? महत्त्वाची माहिती समोर आली

SCROLL FOR NEXT