Kartiki Ekadashi 2023, Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti, Pandharpur News, Vitthal Darshan  saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी महत्वाची बातमी! २ डिसेंबरपासून विठुराया - रखुमाईचं २४ तास दर्शन बंद

भारत नागणे

Pandharpur Vitthal Rukmini Mandir News:

पंढरपुर नगरीमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या कार्तिकी एकादशी यात्रेचा आज (शुक्रवार, १ डिसेंबर) समारोप झाला. आज पासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे सर्व राजोपचार पूर्ववत झाले. भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या देवाची आज मंत्रोच्चारात प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. प्रक्षाळ पूजेने या कार्तिकी यात्रेची सांगता झाली. या सांगते सोबतच देवाचे २४ तास दर्शन बंद होणार आहे.

कार्तिकी यात्रा (Kartiki Yatra) काळात भाविकांना २४ तास दर्शन देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी उभे असतात. याकाळात देवाचे फक्त काही नित्योपचार सुरू असतात. आज (१ डिसेंबर) प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने देवाला दोन वेळा उष्ण पाण्याने स्नान घालण्यात आले. या दरम्यान भक्तांना २४ तास दर्शन देऊन थकलेल्या देवाच्या पायाला लिंबू साखर चोळली जाते. दुपारी पोशाख करून देवाची विधिवत पूजा केली जाते.

रात्री शेज आरतीवेळी देवाला १४ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा दाखवला जातो. या मुळे देवाला आलेला थकवा दूर होतो अशी भावना आहे. आजपासून कार्तिकी यात्रेनिमित्त सुरू ठेवलेले २४ तास दर्शन बंद करण्यात आले आहे. उद्या पासून (शनिवार, २ डिसेंबर) सकाळी सहा वाजता दर्शनासाठी मंदिर उघडले जाईल तर रात्री ११ वाजता दर्शन बंद करण्यात येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) पंढरपुरनगरीमध्ये मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी कोकण,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा तसेच कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शनाची सोय केली होती. तसेच यात्रा काळात व्हिआयपी दर्शनही बंद केले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT