पंढरपूर नगरीमध्ये 14 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये कार्तिकी यात्रा पार पडली. कार्तिक शुद्ध दशमीला विविध राज्यांमधून सात लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मात्र यंदा कार्तिकी यात्रेवर दुष्काळ, महागाई आणि आंदोलनाचे सावट दिसून आले. गतवर्षी पेक्षा यंदाच्या कार्तिकी यात्रेत निम्यानेच उलाढाल झाल्याने व्यापारी आणि दुकानदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पंढरपूर नगरीमध्ये (Pandharpur) कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी पंढरपुरात येत असतात. आषाढी आणि कार्तिकी या प्रमुख दोन यात्रा मध्ये दरवर्षी कोट्यावधी रूपयांची पंढरपूरच्या बाजारात आर्थिक उलाढाल होते. यंदा मात्र कार्तिकी यात्रेवर दुष्काळ आणि आंदोलनाचे सावट दिसून आले .
तसेच कोकण, मुंबई व कर्नाटकमधून येणाऱ्या भाविकांची संख्या यंदा काही प्रमाणात घटल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर परिणाम झाल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. यात्राकाळात प्रामुख्याने प्रसाद, पितळी मूर्ती, देवांचे फोटो, तुळशी माळा,घोंगडी यासह इतर साहित्यांची यात्रेत मोठी विक्री होते. त्यातून मागील वर्षी सुमारे पाचशे कोटींची उलाढाल झाली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यंदा मात्र अडीचशे ते तीन कोटींची उलाढाल झाली. यंदाच्या कार्तिकी यात्रेत निम्यानेच उलाढाल झाल्याने पंढरपुरातील व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. दरम्यान, यंदा कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) महापूजेवरुन राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
एकीकडे मराठा आंदोलकांनी शासकीय महापुजेला विरोध दर्शवला होता तर दुसरीकडे राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने पुजा कोण करणार? असा पेच मंदिर समितीसमोर होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.