Ashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari 2024 : वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी प्रशासन सज्ज, उष्माघात टाळण्यासाठी पहिल्यांदाच पंढरपुरात स्प्रिंकलरचा वापर

Pandharpur Wari 2024 : यंदा वारकऱ्यांना उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे.

भारत नागणे

Pandharpur News : यंदाच्या आषाढी एकादशीला सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या दरम्यान भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी वारी काळात शहरात विविध ठिकाणी पाण्याचे फवारे बसवण्यात येणार आहेत. अशा प्रकारे फवारे पहिल्यांदाच बसवण्यात येणार आहेत.

यंदा वारकऱ्यांना उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने ही तयारी सुरू केली आहे. आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. यामध्ये यात्रा काळातील सोयी सुविधांवर चर्चा झाली.

यामध्ये उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी स्प्रिंकलर म्हणजेच पाण्याचे फवारे बसवण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार निवृत कर्नल सुपानीकर यांनी दिली.

वारीसाठी खास वेबसाईट

संत तुकाराम महाराज आणि  ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा सोहळा लाइव्ह अनुभवता यावा याकरिता जीपीएसद्वारे पालखी ट्रेकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वारकऱ्यांच्या मदतीसाठी पुणे पोलिसांनी वारीची माहिती देण्यासाठी एक वेबसाइट तयार केली आहे. diversion.punepolice.gov.in या वेबसाइटवर सर्वांना पालखी सोहळा आणि वाहतूक मार्गातील बदलाची माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

Pigmentation: चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय?

आंदोलनादरम्यान गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला|VIDEO

Asia Cup : वर्ल्डकप जिंकूच शकत नाही! टीम इंडियाच्या निवडीवर महान खेळाडू भडकला

SCROLL FOR NEXT