Ashadhi Wari 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पारंपारिक दिंड्यांना सरकारकडून मिळणार २० हजारांचे अनुदान

Ashadhi Wari 2024: वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.

Priya More

विनय म्हात्रे, मुंबई

आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari 2024) सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून निघणाऱ्या दिंड्यांना सरकार करून २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. वारकरी साहित्य परिषद मंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची विधानभवनात भेट घेतली. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने सरकारकडे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची मागणी केली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.

पंढरपूरमधील विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी (Pandharpur Wari 2024) मोठ्यासंख्येने आषाढी वारीमध्ये सहभागी होत पंढरपूरच्या दिशेने जातात. या वारीमध्ये राज्यभरातील वारकऱ्यांच्या शेकडोच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या निघतात. अशा महाराष्ट्रभरातून येणाऱ्या एकूण १५०० वारकरी दिंड्यांना सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांमध्ये मोठ्यासंख्येने वारकरी सहभागी होतात. या सर्व पालख्या आणि दिंड्यांसोबत वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात आणि आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी पंढपुरात दाखल होतात. परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, वारकऱ्यांना दुखापतग्रस्त होते, एखाद्या वारकऱ्याचा अपघातात किंवा दुर्घटनेत मृत्यू होतो. तसेच अनेक वारकऱ्यांना काही कारणांनी वारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यांच्या विनंतीनंतर सरकारने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

विठ्ठल पाटील यांनी सांगितले आहे की, 'वारकरी संप्रदाय यांची पालखी निघते त्या सगळ्या पालख्यांना २० हजार रुपयांची देणगी मिळणार आहे. अधिकृत १५०० दिंडी आहेत. याचा फायदा शेतकरी, वारकरी यांना वारी सुरु असताना होणार आहे. यामुळे आर्थिक हातभार लागतो. व्यसन मुक्ती खातं मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. त्यात वारीमध्ये व्यसन मुक्ती संदेश असतो. त्याच खात्यातील पैसे देण्यात यावे ही मागणी केली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

SCROLL FOR NEXT