Shreya Maskar
महाराष्ट्रात अनेक आव्हानात्मक ट्रेकिंग स्पॉट आहेत. यात ढाक बहिरी, कलावंतीण दुर्ग, कळसुबाई शिखर ,हरिहर किल्ला, अलंग मदन कुलंग, हरिश्चंद्रगड यांचा समावेश होतो.
ढाक बहिरी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत रोमांचक आणि आव्हानात्मक ट्रेकिंग स्पॉट आहे. जे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. हे ठिकाण घनदाट जंगलात आहे.
कलावंतीण दुर्ग पनवेलजवळील ट्रेकिंग स्पॉट आहे. हे उंच सुळ्यासारखे दिसते. हिवाळ्यात आणि पावासाळ्यात येथे चढणे धोकादायक ठरते.
हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ल्यावर ट्रेकिंगचा थरार पाहायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत.
अलंग-मदन-कुलंग ट्रेक हा महाराष्ट्रातील सर्वात लांब, आव्हानात्मक आहे. ज्यामध्ये रॅपलिंग आणि ट्रॅव्हर्सिंगची आवश्यकता असते.
हरिश्चंद्रगड हे पश्चिम घाटातील थरार ट्रेकिंग स्पॉट आहे. हा किल्ला चित्तथरारक नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखले जातो. येथे तुम्ही थंडी संपताना जा. जेणेकरून जास्त ऊन लागणार नाही आणि थंड वाऱ्यांचे अडथळे येणार नाही.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ज्याला 'महाराष्ट्राचे एव्हरेस्ट' म्हणूनही ओळखले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.