Police investigation reveals shocking truth behind Pandharpur acid attack case. saam tv
महाराष्ट्र

पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात ट्विस्ट! तरुणीनेच रचला हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा लावला छडा

Pandharpur Acid Attack: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अॅसिड हल्ल्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी चक्रावून टाकणारे सत्य उजेडात आणले आहे.

Bharat Jadhav

  • पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • तरुणीनेच स्वतःवर हल्ला केल्याचं उघड

  • पोलिसांच्या तपासातून सत्य समोर

भारत नागणे, साम प्रतिनिधी

पंढरपूर शहरात रविवारी एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली होती. या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत मोठा ट्विस्ट मिळाला आहे. पीडित तरुणीवर अॅसिड हल्ला करणारा दुसरा तिसरा किंवा कोणी अज्ञात व्यक्ती नव्हता. हा हल्ला स्वत: तरुणीनं केला होता. त्यानंतर तिने आपल्यावर कोणीतरी अॅसिड हल्ला केला असा बनाव केला होता.

वैष्णवी भागवत या 28 वर्षीय तरुणीवर अज्ञात दोन तरूणांनी अॅसिड हल्ला करून जखमी केले होते. या हल्लाची माहिती पीडितेची आईने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणाचा छडा लावला. त्यानंतर अनेकांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.

नेमका काय आहे प्रकार, पोलिसांनी कसा लावला छडा?

प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला समोर आले आहे. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन तिने स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव रचला. तरुणीवर अॅसिड हल्लाची तक्रार मिळताच पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी टीम तयार करून हॉस्पिटलमध्ये पीडिता आणि तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवण्यासाठी पाठवलं.

पीडितेवर अज्ञातांनी अॅसिड हल्ला केल्याची माहिती मुलीच्या आईने दिली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना बनाव केल्याचा संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.

का रचला बनाव?

पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, या घटनेबाबत काल आम्हाला तरूणी वर अज्ञाताने ॲसिड हल्ला केला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही तपास केला, परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पीडितेचा जबाब नोंदवला, मात्र यात तरूणीच्या जबाबात आणि सीसीटीव्हीच्या फुटेजमधील तपशीलात तफावत आढळली. त्यानंतर तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आले.

तरुणीने आपल्या उजव्या बाजुला चेहऱ्यावर ॲसिड टाकले होते. ६० रूपयांना हे ॲसिड कोणत्याही दुकांनामध्ये मिळते, आपण ते बाथरूम टॉयलेट धुण्यासाठी वापरतो. ते तिने एका दुकानातून विकत घेतलं होतं. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, रहदारी नाही, अंधार आहे, त्या ठिकाणी ही तरुणी गेली आणि स्वतःच अंगावर अॅसिड ओतून घेतलं. घरात काही कारणावरून वाद झाले होते. याच वादातून घरच्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव तिने हा बनाव रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT