Pandharpur Accident Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Accident News: वादळी वाऱ्याने झोळी हवेत उडाली; २ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, मन सुन्न करणारी घटना

2 year old child pass away : झोपेतच झोळी खाली पडल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झालाय.

भारत नागणे

Pandharpur Storm News : पंढरपूर येथून काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या थैमानाने शेतकरी हवालदील झाला आहे. अशात हा अवकाळी पाऊस आता एका चिमुकलीच्या जिवावरही उठला आहे. झोपेतच झोळी खाली पडल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झालाय. (Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील जवळा येथे मरीआई गाडीवाले कुटुंबावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कस्तुरी साधू चव्हाण असं २ वर्षीय मृत चिमुकलीचं नाव आहे. वावटळ आल्याने बांधलेली झोळी खाली पडली. सोसाट्याच्या वाऱ्याने झोळीसकट चिमुकली एका दगडावर आफटली.

प्रत्येक आईला आपलं बाळ झोपल्यानंतरच घरातली कामे उरकता येतात. काल कस्तुरीच्या आईने तिला पोटभर जेऊ घातले आणि झोळीत तिला झोका देत झोपवले. आपलं बाळ शांत झोपलेलं असताना आईने देखील आपल्या कामाला सुरूवात केली. अशात अचानक दुपारच्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि वादळ (Storm) आले.

या घटनेत आपल्या झोपलेल्या चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत होईल याची आईला काहीच कल्पना नव्हती. चिमुकली गाढ झोपेत असतानाच तिच्यावर काळाने घाला घातला. झोळी उडून दगडावर आपटली यात कस्तुरीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT