Mumbai Vaccination Update : मुंबई कोरोनाच्या विळख्यात; ६० वर्षांवरील नागरिकांना नाकाद्वारे लसीकरण

Incovac Vaccination : शुक्रवारपासून मुंबई महापालिकेतर्फे ही लस देण्यात येणार आहे.
Mumbai Vaccination
Mumbai Vaccination Saam TV

निवृत्ती बाबर

Mumbai Corona Cases Update: राज्यात कोरोना रुग्न संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही अनेकांना कोरोनाची लागण होताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांना नाकाद्वारे लस दिली जाणार आहे. शुक्रवारपासून मुंबई महापालिकेतर्फे ही लस देण्यात येणार आहे.(Covid In Mumbai)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ‘इन्कोव्हॅक’ असं नाकामार्फत देण्यात येणाऱ्या लसचे नाव आहे. शुक्रवारपासून मुंबई (Mumbai) महापालिकेतर्फे शहरातील २४ केंद्रांवर ही लस अपलब्ध होत आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा अधिक काळ झालेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना या लशीची वर्धक मात्रा घेता येणार आहे.

Mumbai Vaccination
Corona काळात एकट्या Beed जिल्ह्यात जवळपास 20 हजार पेक्षा जास्त बालविवाह ?

१६ जानेवारी २०२१ पासून देशभरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसार मुंबईत प्राधान्य गटांचे आणि त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले. करोना लशीची वर्धक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे. आता २८ एप्रिलपासून ‘इन्कोव्हॅक’ ही लस ६० वर्ष वयावरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी या लशीची वर्धक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही लशीसाठी वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Mumbai Vaccination
Amravati Crime: संतापजनक! अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com