Rain Updates Saam TV
महाराष्ट्र

Rain Updates : मुंबईसह, पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी १७ फुटांवर, VIDEO

Panchganga River Water Level : आज सकाळपासून कोल्हापूरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी थेट १७ फुटांवर पोहचली आहे. गेल्या २ ते ३ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.

Ruchika Jadhav

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

मुंबईसह पुण्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील घाटकोपर, कुर्ला या शहरांसह ठाण्यापासून पुढे कर्जत आणि कसारापर्यंत गेल्या २ ते ३ दिवसांपासून सातत्याने जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुण्यातही पावसाची जोरदार बॅटींग सुरूये. त्यातच कोल्हापूरकर सुद्धा मुसळधार पावसाने सुखावले आहेत.

आज सकाळपासून कोल्हापूरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी थेट १७ फुटांवर पोहचली आहे. गेल्या २ ते ३ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने वाढताना दिसतेय. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

६ बंधारे पाण्याखाली गेल्याने बांधाऱ्यावरील वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड तर कासारी नदीवरील येवलुज असे सहा बंधारे पाण्याखाली गेलेत. पावसामुळे राधानगरी धरण २९.४७% भरलंय. तर धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडीभरून वाहू लागल्या आहेत. पावसाने राधानगरी, पाटगाव, घटप्रभा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राधानगरी- ८० टक्के, पाटगाव- १३० तर घटप्रभा येथे १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोलीत तीन दिवसाच्या विश्रांती नंतर पाऊस बरसला शेतकरी राजा सुखावला

हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे ओढ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आलेय. तर यामुळे शेतकऱ्यांच्या उगवलेल्या पिकांना देखील जीवदान मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT