Shreya Maskar
पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर हे समृद्ध ठिकाण आहे. कोल्हापूर हे 'दक्षिण काशी' नावाने ओळखले जाते. कोल्हापूर महाराष्ट्रातील पंचगंगा नदीच्या काठा वसलेले आहे. कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक तेथील मंदिरांचे दर्शन घेतो. तसेच कोल्हापूरला निसर्गरम्य सौंदर्य देखील लाभले आहे. त्यामुळे कोल्हापूरला गेल्यावर 'या निसर्गरम्य ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
कोल्हापूरचे रंकाळा तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे. तलावाच्या आजूबाजूला सुंदर फुले पाहायला मिळतात. तसेच खाण्यपिण्याचे अनेक स्टॉल तेथे उपलब्ध आहेत. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी करण्यात येते.
पन्हाळा किल्ला थंडगार हवेचे ठिकाण आहे. या किल्ल्यावर इतिहासाच्या खुणा आणि डोंगरावरून निसर्गाचे अद्भूत सौंदर्य पाहायला मिळते. कोल्हापूरला आल्यावर पर्यटकांची पन्हाळाला गर्दी जमते.
कणेरी मठ हे कोल्हापूरमधील प्रसिद्ध संग्रहालय आहे. कोल्हापूरला आल्यावर पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. येथे शिल्पांच्या स्वरूपात ग्रामीण जीवन पाहायला मिळते.
कोल्हापूर येथील पोहाळे येथे डोंगरात कोरलेली बौद्धकालीन लेणी पाहायला मिळतात. या लेण्यांचा परिसर सुंदर-स्वच्छ आहे.
कोल्हापूर-विजयदुर्ग मार्गावर गगनबावडा तालुक्यात करूळ घाट बांधण्यात आला आहे. पावसात या घाटातून प्रवास केल्यास निसर्गाच्या आणखी जवळ जायला मिळते.
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य विविध प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे जाऊन तुम्ही जंगल सफारीचा आनंद लुटू शकता.
कोल्हापूरमधील भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधण्यात आले आहे. हे धरण पूर्ण भरल्यावर दरवाजे आपोआप उघडतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.