Sunil Bhusar Saam tv
महाराष्ट्र

Sunil Bhusar : पालघरचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसार यांच्यावर मोठी जबाबदारी; शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Palghar News : पक्ष फुटीच्या लाटेत सुनील भुसारा निष्ठेने पक्षासोबत राहिल्याने पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. यातूनच त्यांच्यावर विश्वास टाकत मोठी जबाबदारी सोपविण्यात आली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
मोखाडा (पालघर)
: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येत आहे. नुकताच प्रदेश अध्यक्ष पद बदलल्यानंतर आता प्रदेश उपाध्यक्ष पदी विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी आदिवासी जिल्ह्या बरोबरच उत्तर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी भुसारा यांच्यावर असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड केल्यानंतर आता राज्यभर अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यातूनच भुसारा यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी या निमित्ताने देण्यात आली आहे. याशिवाय पक्ष फुटीच्या सगळ्या लाटेत सुद्धा सुनील भुसारा हे निष्ठेने पक्षा सोबत राहिल्याने पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. यातूनच त्यांच्यावर विश्वास टाकत मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पक्ष स्थापनेपासून भुसार पवार यांच्यासोबत 

जेव्हा सर्व सामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्ष देण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर सुनील भुसारा यांचे नाव प्रदेशाध्यक्षांच्या चर्चेत अग्रस्थानी घेण्यात येत होते. भुसारा हे पक्ष स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत असून त्यांचे वडील दिवंगत चंद्रकात भुसारा हे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच सभापती यासारख्या पदांवर कार्यरत होते. त्यानंतर त्याच्या मातोश्री पार्वतीताई भुसारा यांनी सुद्धा जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम पाहिले आहे. याच राजकीय पार्श्वभूमीतून भुसारा हे राजकारणात सक्रीय होऊन युवक हे जिल्हा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. 

पक्ष एकत्र येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. मात्र पक्ष फुटल्यानंतर त्यांनी निष्ठा जपत शरद पवार यांच्या सोबत राहणे पसंत केले. त्यावेळी त्यांच्या भूमिकेचे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. पक्षात युवा नेते रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या अतिशय जवळचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातून नरहरी झिरवाळ प्रमाणे अनेक आदिवासी नेते अजित पवार यांच्या बरोबर गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासोबत भुसार राहिले. यामुळे आता आदिवासी चेहरा घेऊन राज्यात काम करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT