Palghar Dhamani Dam Saam tv
महाराष्ट्र

Dhamani Dam: धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले; पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

Palghar Rain News: मागील आठवडाभरापासून राज्यात पाऊस सुरु आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

रुपेश पाटील

पालघर : पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच धामणी धरण ८० टक्के भरले असून या धरणातून सध्या सूर्या नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

मागील आठवडाभरापासून राज्यात पाऊस सुरु आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार (Palghar) पालघर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आले आहेत. हे पाणी धरणात जात असल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ होत आहे. (Dhamani Dam) धामणी धरण देखील ८० टक्के भरले आहे. 

धामणी धरण ८० टक्के भरले असून पाऊस सुरूच (Heavy Rain) असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. यामुळे धरणाचे तीन दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या धरणातून सध्या ३२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे. कवडास आणि धामणी या दोन्ही धरणांमधून सूर्या नदीत २२ हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या ७० पेक्षा अधिक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT