Palghar tragedy: Two-year-old girl dies in Jawhar hospital due to lack of treatment amid NHM strike. saamtv
महाराष्ट्र

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Palghar Health Workers Strike: पालघर जव्हार येथील एका दोन वर्षांच्या मुलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. एनएचएम आरोग्य कर्मचारी संपावर गेले आहेत. ही दुर्घटना महाराष्ट्राच्या आदिवासी भागात आरोग्यसेवेचे संकट अधोरेखित करते.

Bharat Jadhav

  • गाझा युद्धविराम चर्चेदरम्यान दोहामध्ये इस्रायलचा हवाई हल्ला.

  • हमास नेते खलील अल-हय्या यांना लक्ष्य केल्याचा दावा.

  • अमेरिकेच्या मध्यस्थीतील युद्धबंदी चर्चेला धक्का बसला.

फैयाज शेख, साम प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संपावर गेल्यामुळे दोन वर्षीय मुलीला वेळेवर उपाचार मिळाले नाहीत. यामुळे तिचा दु्र्दैवी मृत्यू झालाय. रुग्णालयात तंत्र डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी दोन वर्षीय प्रियल सुरेश धिंडा या मुलीचा मृत्यू झाला. संपामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुलभाग असलेल्या जव्हार तालुक्यात आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले सर्व कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे जव्हार तालुक्याच्या मुख्य आरोग्य केंद्र असलेल्या पतंगशाह कुटीर रुग्णालय येथील वैद्यकीय व्यवस्था अक्षरशः सलाईनवर चालू आहे. रुग्णालयात कायमस्वरूपी (पर्मनंट) कर्मचारी अत्यंत कमी असल्याने त्यांच्यावर ताण वाढला आहे.

तातडीच्या सेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे उपचारासाठी अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. रुग्णालयात अद्याप आवश्यक तेवढ्या आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना नाशिक येथे पाठविण्याची वेळ येते. नाशिक चार प्रवास हा 80 किलोमीटर चा असल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

या भागातील जनतेला आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाकडून अनेक वेळा मागण्या झाल्या असल्या तरी परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचा संप अद्याप सुरू असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

आरोग्य यंत्रणा अशा वेळी कुचकामी ठरत असल्याचे लोकप्रतिनिधी व नागरिकांनी व्यक्त केले आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने कर्मचाऱ्यांची समस्या सोडवावी, पतंगशाह कुटीर रुग्णालयाला आवश्यक सुविधा द्याव्यात, तसेच अतिरिक्त कायमस्वरूपी डॉक्टर व कर्मचारी यांची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासन, आरोग्य विभाग तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्वरित लक्ष घालून ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग? सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शाहांची भेट

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?

अजितदादांची राजकीय हत्या? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, VIDEO

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर; किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT