Palghar Dahanu Theft News  Saam TV
महाराष्ट्र

Palghar News: डहाणू शहरात चोरट्यांचा सुळसुळाट; रात्रभरात डजनभर दुकाने फोडली, परिसरात खळबळ

Dahanu Theft News: डहाणू पोलीस ठाण्यालगत असलेल्या ८ ते १० दुकानांमध्ये चोरट्यांनी जबर चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (१४ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली.

Satish Daud

Palghar Dahanu Theft News

डहाणू पोलीस ठाण्यालगत असलेल्या ८ ते १० दुकानांमध्ये चोरट्यांनी जबर चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (१४ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. चोरट्याने जॅक लावून दुकानांचे शटर तोडले आणि महागड्या वस्तूंवर डल्ला मारला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून डहाणू शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे सर्रास दुकाने फोडत आहेत. पोलीस (Police) प्रशासन रात्रीच्या वेळी ग्रस्त घालत नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने डहाणू पोलीस स्टेशनलगत असलेल्या सात ते आठ दुकानांचे शरट तोडले. हार्डवेअर दुकान , मेडिकल , किराणा दुकान अशा दुकानांमधून चोरट्याने रोख रक्कम तसेच महागड्या वस्तू लंपास केल्या. (Latest Marathi News)

धक्कादायक बाब म्हणजे चोरी झालेली दुकाने डहाणू पोलीस स्टेशनपासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे. दरम्यान, चोरीची ही घटना दुकानांमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे डहाणू शहरातील बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात लगत देखील पोलीसग्रस्त करत नसल्याचा आरोप या व्यापारांकडून करण्यात आला आहे. सध्या पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT