Palghar Crime Ashok Dhondi Kidnapping Case saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime: शिवसेना पदाधिकारी अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; गुजरातमधील दगड खदानीत सापडलेली कार धोडींची?

Palghar Crime Ashok Dhondi Kidnapping Case: शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धोडी हे मागील बारा दिवसापासून बेपत्ता असून त्यांच अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा संशय पालघर पोलिसांना आहे.

Bharat Jadhav

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

शिंदे गट शिवसेनेचे संघटक अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. पदाधिकारी धोडी यांचे अपहरण होऊन त्यांची हत्या झाली असावा असा संशय पोलिसांना आहे. अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता आहेत. आज एक कार पोलिसांना सापडलीय. ही कार धोडी यांची असल्याचा संशय पालघर पोलिसांना आहे. पुढील तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता आहेत. धोडी याचे अपहरण होऊन त्यांचा घातपात झाला असावा, असा पालघर पोलिसांना संशय आहे. अशोक धोडी यांच्या शोधार्थ पोलिसांनी आठ पथक तयार केली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या तुकड्या तैनात करण्यात आली आहेत. आज पोलिसांना धोडी अपहरण प्रकरणी नवी माहिती मिळालीय. अपहरण प्रकरणी पालघर पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई करत आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही पोलिसांना बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाहीये. मात्र आज पालघर पोलिसांना एका दगड खदानीत कार सापडलीय. गुजरातमधील सारेगम येथील माला फलिया येथील एका बंद पडलेल्या दगड खदानीमध्ये लाल रंगाची ब्रिजा कार सापडलीय. ही कार धोडी यांची असल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान २० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेनं गेल्याचं एका सीसीटीव्ही दिसून आलं होतं. गुजरातमध्यील बंद पडलेल्या दगड खाणीत कार सापडल्यानंतर पालघर पोलीस तपासासाठी गुजरातमधील दगड खदानीवर पोहोचले आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. काहीच वेळात अशोक धोडी यांची गाडी पाण्यातून बाहेर काढली जाणार आहे.

अशोक धोडी यांचा घातपात झाल्यास गाडीतच मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. मिळालेल्या माहितीनुसार, धोडी यांचे २० जानेवारीला अपहरण झाले होते. त्या दिवशी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. याप्रकरणी माहिती देताना पोलीस म्हणाले की, डहाणूहून निघाल्यानंतर धोडी यांची गाडी रस्त्यातील एका घाटामध्ये अडवण्यात आली होती. त्या ठिकाणी गाडीच्या काचेचे अवशेष त्याचबरोबर काही खाणाखुणा सापडल्या होत्या.

याप्रकरणी अशोक धोडी यांच्या ब्रिझाकारसह एक आयशर टेम्पो आणि एका पिकपचाही वापर करण्यात आला अशी माहितीही पोलिसांनी दिलीय. आज बाराव्या दिवशी पोलिसांना अपहरण प्रकरणी एक लीड मिळालीय. दरम्यान पोलिसांना पाच आरोपींनी धोडी यांचं अपहरण केल्याचा संशय आहे. हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT