Dharashiv Farmers Saam Tv
महाराष्ट्र

Farmers Loan : शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेणे जवळपास अशक्य; आमदाराने सांगितलं नेमकं कारण

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील ४५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जखाती थकीत झाली आहे. या गंभीर परिस्थितीला महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

Alisha Khedekar

  • धाराशिव जिल्ह्यात ७७२ कोटींचं शेतकरी कर्ज थकीत, ४५ हजारांहून अधिक खाती एनपीएमध्ये

  • पाच वर्षांतील नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्न घट व कर्जफेडीचा असमर्थपणा

  • आमदार कैलास पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट आरोप

  • शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी कर्ज न मिळण्याची भीती, सरकारकडे तत्काळ उपायांची मागणी

धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे गडद सावट पुन्हा एकदा पसरले आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार ५४३ शेतकऱ्यांची कर्जखाती थकीत झाली असून त्याचे एकूण कर्ज ७७२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ही सर्व खाती आता थेट एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स)मध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेणे जवळपास अशक्य झाले आहे.

मागील पाच वर्षांत नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, गारपीट आणि सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं. यामुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे जुने कर्ज फेडणे अवघड झालं आणि परिणामी ही खाती बँकांनी थकीत घोषित केली आहेत. नव्या हंगामासाठी बियाणं, खते, औषधं आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या बाबींना निधी मिळवणं अशक्य होत चाललं आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की, सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. पण आजही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. हे आश्वासन कुठे गेलं?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

त्यांनी यावर अधिक भाष्य करताना म्हटलं की, “आजवरचा अनुभव असा आहे की, फक्त थकीत कर्जदारांनाच कर्जमाफी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता तरी कर्जमाफी मिळेल या आशेने मुद्दाम कर्ज थकवलं, पण तीच खाती आता एनपीएमध्ये गेली आहेत. याला जबाबदार कोण? दिलेला खोटा शब्दच या संकटामागे कारणीभूत आहे.”

जिल्ह्यातील ही स्थिती पाहता, सरकारने तत्काळ निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नव्या हंगामाची सुरुवात होण्याआधीच कर्ज आणि एनपीएच्या संकटाने शेतकरी पुन्हा निराशेच्या गर्तेत अडकत आहेत. सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची कर्जखाती थकीत आहेत?

तब्बल ४५,५४३ शेतकऱ्यांची कर्जखाती थकीत असून ती आता एनपीएमध्ये गेली आहेत.

या संकटामागचं प्रमुख कारण काय आहे?

मागील पाच वर्षांतील नापिकी, गारपीट, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्न घटल्याने शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत.

आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर काय आरोप केला आहे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं 'सातबारा कोरा' करण्याचं आश्वासन हवेत गेल्याचं म्हणत त्यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी का येत आहेत?

थकीत कर्जामुळे बँकांनी खाती एनपीएमध्ये टाकली असून त्यामुळे नव्या कर्जासाठी पात्रता संपली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT