Ajit Pawar On Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report

Girish Nikam

लोकसभेत अजित पवारांच्या पक्षाची चांगली कामगिरी झाली नाही. त्यात बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजितदादांच्या जिव्हारी लागलाय. एव्हढ कमी होतं की काय मित्र पक्षातील भाजपचे अनेक नेते आणि शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावर आणि त्यांच्या पक्षावर उघडपणे टीका करतायेत.

महायुतीत अजित पवार नकोसे असं चित्र असताना अजित पवारांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. करमाळ्यात जनसन्मान यात्रेत शरद पवार हे आमचे दैवत आहेत. आम्ही चुकलो तर कान धरा, असं विधान अजित पवारांनी केलंय.

मात्र या वक्तव्यानं अजित पवार भावनिक राजकारण करतायत का? असा सवाल उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी 'कुटुंब सोडणं माझी चूक होती' अशी जाहीर कबुली अजित पवारांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमात दिली होती. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम - हलगेकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होती. त्यामुळे त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पडल्याची जाहीररित्या कबुली दिली होती.

अजित पवार यांच्या या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं.

एवढंच नव्हे तर बारामतीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांनाही पवारांवर टीका करण्यापासून रोखलं होतं. आता 'पवार साहेब आमचं दैवत' या वक्तव्यामुळे अजित पवारांना खरंच पश्चाताप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा हा भाग आहे याबाबत जनतेला प्रश्न पडलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे पतीसोबत रोमँटिक फोटोशूट, पाहा PHOTOS

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉन्सला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

SCROLL FOR NEXT