महाराष्ट्र

Osmanabad: ऐन नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला

लातूर जिल्ह्यातील सारोळा येथील दाम्पत्य व मुलगा असे तिघे जण दुचाकीवरून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) काल वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दुचाकीवरून सोलापूरकडे जात असताना बसने (ST Bus) पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एका भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

तर या अपघातात (Accident) दोघे जण जखमी झाल्याची घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर घडली आहे. लातूर जिल्ह्यातील सारोळा येथील दाम्पत्य व मुलगा असे तिघे जण दुचाकीवरून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. (Solapur-Dhule National Highway)

पाहा व्हिडीओ -

देवीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाले दरम्यान रस्ता ओलांडताना पंढरपूर लातूर या बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील योगेश संतोष बेलारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आई-वडील असे दोघे गंभीर जखमी झाले.

तर दुसरा अपघात हा नळदुर्ग तुळजापूर महामार्गावर घडला तुळजापूरकडून नळदुर्गकडे जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला समोरून धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनाची नोंद नळदुर्ग व तामलवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा हफ्ता आला नाही? मग या गोष्टी लगेचच तपासा

Navneet Rana: 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

Maharashtra Live News Update: आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला झटका, राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

Love Letter : महिने गेले वर्ष लोटले, पण आठवण काही जाईना, प्रेमाची ट्रेन पुन्हा येईना

Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT