Manasvi Choudhary
निरोगी केसांसाठी केसांना शॅम्पू लावणे केवळ योग्य नाही तर केसांचे आरोग्य देखील तितकच महत्वाच आहे.
केसांच्या मुळांची टाळूची काळजी घेतल्यास केस गळती, टाळूला खाज येणे यासारख्या समस्यांना आराम मिळतो.
केसांची काळजी घेण्यासाठी टाळूची काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी नेमके काय करावे हे जाणून घ्या.
चेहऱ्याला स्क्रब करतो त्या प्रमाणे टाळूला देखील स्क्रब करा यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची मुळे मोकळी होतात.
डोके थोडे खाली वाकवून ५ ते १० मिनिटे बोटांच्या टोकांनी टाळूला मसाज करा. यामुळे केसांची वाढ जलद होते.
केस धुण्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर कमी करा यामुळे टाळू कोरडा होतो.
पाण्यात रोजमॅरीची पाने उकळून ते पाणी गाळून स्प्रे बाटलीत भरा आणि रोज रात्री टाळूला लावा.
टाळूचा नैसर्गिक ओलावा टिकवण्यासाठी केस धुवून झाल्यानंतर अॅप्पल व्हिनेगर पाण्यात मिक्स करून टाळूवर लावा यामुळे कोंडा होत नाही.