नाशिकमध्ये बैलगाडा शर्यत प्रशासनानं बंद पाडली; परवानगी आणि कोरोना नियनांचे उल्लंघन केल्याने कारवाई Saam Tv
महाराष्ट्र

परवानगी नसतानाही आयोजन, कोरोना नियम पायदळी, नाशकात बैलगाडा शर्यत प्रशासनाकडून बंद

या शर्यतीला पोलिस आणि प्रशासनाची परवानगी नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: नाशिकमधील ओझर येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीला पोलिस आणि प्रशासनाची परवानगी नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर ही बैलगाडा शर्यत रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. (Organized without permission, Corona rule pedestrian, closed by bullock cart race administration in Nashik)

हे देखील पहा -

नाशिकच्या (Nashik) ओझर (Ojhar) मध्ये आयोजित बैलगाडी शर्यतीला पोलीस आणि प्रशासनाची परवानगी नसल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली होती. त्यामुळे परवानगी शिवाय शर्यत घेणारे आयोजक अडचणीत आले. शर्यतीसाठी जिल्हाभरतून शेतकरी बैल जोडी आणि घोडे घेऊन दाखल झाले होते. यावेळी शर्यतीतील बैलगाडी अनियंत्रित झाल्यानं अपघातही झाला होता. बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलजोडी उधळल्याने बाजूला लावलेल्या गाड्यांवर दोन बैल आदळले आणि या दोन्ही बैलांची शिंग गाडीत अडकले यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले.

शर्यतीसाठी परवानगी घेतलेली नसल्याने पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. शर्यतीचे आयोजक माजी आमदार अनिल कदम आणि पोलिसांची चर्चा झाली आणि ओझरमधील बैलगाडा शर्यत अखेर बंद करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळले जात नसल्यानं तसेच प्रशासनानंही बैलगाडा शर्यतीला दिली नसल्याने परवानगी शर्यत ही बंद करण्यात आली. शर्यतीदरम्यान सुरू असलेल्या गोंधळामुळे शर्यत बंद करण्याची आयोजकांवर वेळ आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT