ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवली, तिसरी लाट ओमिक्रॉनचीच - राजेश टोपे

ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता वाढलीये, त्यामुळेच निर्बंध लागू केले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तिसरी लाट ओमिक्रॉनचीच - राजेश टोपे
तिसरी लाट ओमिक्रॉनचीच - राजेश टोपे Saam Tv News
Published On

जालना : राज्यात तिसरी लाट ओमिक्रॉनचीच असेल. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता वाढलीये, त्यामुळेच निर्बंध लागू केले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. - (Health Minister Rajesh Tope Says Third Wave Of Corona Virus Should Be Omicron)

केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचा असून याबाबत आता निर्णय घ्यायला हवा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसेच, 12 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून याबाबत निर्णय व्हायला पाहिजे, असंही राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

हेही वाचा -

तिसरी लाट ओमिक्रॉनचीच - राजेश टोपे
भीती नको, कोरोनाचे नियम पाळण्याची गरज, लोकांनी गर्दी करु नये, आरोग्य मंत्र्यांचं आवाहन

राज्यात ओमिक्रॉनचे 100 रुग्ण

राज्यात ओमिक्रॉनचे जवळपास 100 रुग्ण आहेत. राज्यात 87 टक्के लोकांनी पहिला डोस घेतलाय. तर, 57 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतलाय. लोकांनी लसीकरणात सहभाग घेतला पाहिजे तरच लसीकरण पूर्ण होईल असं ही टोपे म्हणाले. राज्यात दररोज 6 ते 7 लाख लसीकरण होत असून लसीकरण वाढवण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

नियम पाळून हॉटेल सुरू ठेवावे

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल चालकांनी रात्रभर हॉटेल सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर टोपे यांनी नियम पाळून हॉटेल सुरू ठेवावे असं म्हटलं आहे. लॉकडाऊनसाठी आपण 800 मॅट्रिक टन ऑक्सिजन वापराची मर्यादा ठेवली होती. पण, ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही मर्यादा आता घटवून 800 वरुन 500 वर आणावी लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

हॉलमध्ये सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी तसेच लग्नात हॉलच्या क्षमतेपेक्षा 25 टक्के म्हणजे 100 लोक असावे तर लग्न समारंभात ओपन स्पेसला 250 लोक इतकी मर्यादा घालून देण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. या दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांनी ऐकत्र येऊ नये. हॉटेलमध्ये केवळ 50 टक्के लोकांनी असावं. त्यापेक्षा गर्दी करु नये.

राज्यात कोरोनाचे 1 हजार 400 रुग्ण

यूरोपमध्ये संसर्ग अधिक वेगाने पसरत असला तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, कोरोना नियम पाळले पाहिजे असं आवाहन टोपे यांनी केलं. आता सध्या राज्यात कोरोनाचे 1 हजार 400 च्या आसपास रुग्ण आढळून येत असून भविष्यात तिसरी लाट ओमिक्रॉनची असेल असं भाकीत देखील टोपे यांनी व्यक्त केलंय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com