Loudspeaker controversy  Saam Tv
महाराष्ट्र

भोंग्यांबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश रद्द

नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी भोंग्यांबाबतचे आदेश केले रद्द केले आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी भोंग्यांबाबतचे आदेश केले रद्द केले आहे. भोंग्याबाबत शहरात सर्व परिस्थिती आढावा घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे नव्या पोलिस आयुक्त (Police Commissioner) जयंत नाईकनवरे यांचे मत आहे. भोंग्याविषयी महाराष्ट्र (Maharashtra) शासन जो निर्णय घेणार आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे मत आहे. १७ एप्रिल दिवशी दीपक पांडेय यांनी भोंग्याविषयी मनाई आदेश जारी करण्यात आला होता.

भोंग्याबाबत काय होते आदेश

- ३ मे पर्यंत मशिदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार होती नाहीतर ३ मे नंतर कारवाईला सामोरे जावे लागणार होते

- कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक होती

- अजानवेळी मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही

हे देखील पाहा-

नाशिकचे (Nashik) तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या या आदेशामुळे (Order) राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. पांडे यांनी दिलेल्या आदेशामध्ये सांगितले होते की, मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नव्हती. शिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी (Permission) असणे आवश्यक राहणार होते. नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावर भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार होती. ३ मे पर्यंत मशीदच नव्हे, तर सर्व धार्मिक स्थळावर भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार होती.

यानंतर ३ मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असणार असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशामध्ये सांगितले होते. नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशात सांगितले की, ध्वनीक्षेपकाविषयी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा दिलेला आदेश आणि यानुसार राज्य सरकारचे आदेशनुसार भोंग्याच्या आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या भोंग्याच्या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे, असे पांडे यांनी काढलेल्या आदेशात सांगितले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : आज काय बनवायचं? हा प्रश्न आता कायमचा बंद, 'हा' घ्या तुमच्या महिन्याभराचा मेनू प्लॅन

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Dating App: भयान वास्तव! डेटिंग अ‍ॅपवरचे ६५ टक्के युजर्स विवाहित अन् कमिटेड

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

SCROLL FOR NEXT