Uddhav Thackeray Meets Sonia Gandhi SAAM TV
महाराष्ट्र

Bengaluru Opposition Meeting: उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा, बंगळुरूत मोठी खलबतं

Uddhav Thackeray Meets Sonia Gandhi: देशाच्या राजकारणात आज मोठा दिवस आहे. एकीकडे विरोधी पक्षांकडून बंगळुरूमध्ये भाजपविरोधी मोर्चाची रणनिती ठरत आहे. दुसरीकडे दिल्लीत एनडीएची देखील बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Chandrakant Jagtap

Opposition Meeting in Bengaluru Updates: बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर आज विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी कालपासूनच देशभरातील विरोधी पक्षांचे नेते बंगळुरुमध्ये दाखल झाले आहे.

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारीच बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि काल सोनिया गांधी यांच्यात काल महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. काल स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर आज होणाऱ्या बैठकतही ते उपस्थित राहणार आहे.

बंगळुरूमध्ये पहिल्या दिवशी विरोधी पक्षांच्या डिनर डिप्लोमसीत 23 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. 'युनायटेड वुई स्टँड' या विरोधकांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जु खर्गे म्हणाले की, "सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रीय कल्याणाचा अजेंडा जोपासण्यासाठी समविचारी विरोधी पक्ष एकत्र काम करतील." "चांगली सुरुवात झाली.

बेंगळुरूमध्ये नेमकं काय सुरू आहे?

बंगळुरूमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, एमके स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, हेमंत सोरेन, भगवंत मान, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांसासह विरोधी पक्षांच्या नेत्यांची सोमवारी डिनर मिटिंग झाली. त्यानंतर आज मंगळवारी होणाऱ्या बैठकीत विरोधकांचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरणार आहे. तसेच सर्व विरोधी पक्षांमध्ये अधिक समन्वय आणि संवाद यासारख्या मुद्द्यांवर देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. (Tajya Marathi Batmya)

विरोधी पक्ष Vs भाजप शक्तीप्रदर्शन

देशाच्या राजकारणात आज मोठा दिवस आहे. एकीकडे विरोधी पक्षांकडून बंगळुरूमध्ये भाजपविरोधी मोर्चाची रणनिती ठरत आहे. यासाठी बंगळुरुमध्ये किमान 23 पक्ष उपस्थित आहेत, तर दुसरीकडे दिल्लीत एनडीएची देखील बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Latest Political News)

या बैठकीसाठी 38 पक्ष उपस्थित राहणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या दोन्ही दोन्ही बैठकांमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात रणनिती ठरवली जाणार आहे. पुढील वर्षीच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT