राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली आहे आणि याला कारण ठरलयं ठाकरेंच्या नगराध्यक्षाची शिंदेंच्या बैठकीतली उपस्थिती...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलावलेल्या शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांच्या विशेष बैठकीला ठाकरेसेनेचे कोकणातील नेते आणि सिंधुदुर्गचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावल्यानं राजकीय़ वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलीय... नेमकं प्रकरण काय पाहूयात..
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिंदेसेनेच्या 63 नगराध्यक्षांची बैठक बोलावली
नगराध्यक्षांना येणाऱ्या अडचणी समजून घेणं, महायुतीत संवाद ठेवणं आणि विकासकामांवर भर देणं, या उद्देशाने ही बैठकीचं आयोजन
मात्र, या बैठकीत ठाकरे गटाचे संदेश पारकर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कार्यक्रम संपताच कोणाच्याही नजरेस न पडता पारकर यांनी चव्हाण सेंटरमधून गुपचूप काढता पाय घेतला. मात्र त्यांच्या उपस्थितीमुळे ते शिंदेसेनेत प्रवेश करणार का, अशी चर्चा आता रंगू लागलीय...
दरम्यान बैठकीचे फोटो समोर आल्यानंतर कणकवली शहराच्या विकासासाठी मी बैठकीला उपस्थित होतो, असं स्पष्टीकरण संदेश पारकर यांनी दिलंय..एवढंच नाही तर याआधीही आपण बैठकीला हजर राहिल्याचं सांगितलयं...मात्र शिंदेसेनेच्या उदय सामंतानीं पारकरांची उपस्थितीवरूनच ऑपरेशन टायगरचे संकेत दिलेत...
मुळात संदेश पारकर हे कणकवलीचे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी शहर विकास आघाडीमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ठाकरेसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामाही त्यांनी दिला होता..आणि उद्धव ठाकरेनेंही तो मंजूरही केला होता. त्यावेळी ठाकरेसेनेनं शहर विकास आघाडीमधून निवडणुक लढवणाऱ्या पारकरांना पाठिंबा दिला होता...मात्र त्यानंतर ठाकरेसेनेच्या बैठकीला पारकर कधीही हजर राहिले नाहीत, असं विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी केलयं...मुळात ठाकरेसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षात सातत्यानं केली जातेय... त्यात कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या प्रयोगानंतर ठाकरेसेनेवर मित्रपक्षांनी चांगलीच टीका केली होती..पारकर शहर विकास आघाडीचं प्रतिनिधीत्व करत असले तरी कणकवलीत त्यांची ओळख ठाकरे सेनेचे नेते अशीच आहे..त्यामुळेच ते थेट शिंदेसेनेच्या बैठकीला गेल्यानं ऑपरेशन टायगरची सुरुवात कोकणातून झालीय का? अशी चर्चा रंगलीय.....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.