Operation Tiger Saam TV Marathi News
महाराष्ट्र

'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

Operation Tiger latest updates : 'ऑपरेशन टायगर'चा सुगावा मातोश्रीपर्यंत कसा पोहोचला याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी केलेल्या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले.

Namdeo Kumbhar

शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार फोडण्यासाठी आखण्यात आलेल्या 'ऑपरेशन टायगर'चा सुगावा 'मातोश्री'ला नेमका कसा लागला, याची खळबळजनक इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना थेट ऑफर देण्यात आली होती. मात्र, ही माहिती वेळेतच उघड झाल्याने हे 'ऑपरेशन' अपयशी ठरले अन् मातोश्रीवर याची माहिती पोहोचली.

पेपर मातोश्रीवर कसा फुटला?

  • एकनाथ शिंदेंच्या गटाकडून ऑफर येताच खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचे वडील प्रकाश वाजे यांच्याशी याविषयी चर्चा केली.

  • प्रकाश वाजे यांनी तात्काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही निकटवर्तीय नेत्यांशी संपर्क साधला आणि या संपूर्ण प्रकाराची कल्पना दिली.

  • काकडे आणि शिरोळे यांच्या मध्यस्थीने ही माहिती थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.

  • माहिती मिळताच उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि राजाभाऊ वाजे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

उद्धव ठाकरेंना दिला शब्द - प्रकाश वाजे

या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना प्रकाश वाजे म्हणाले, "शिवसेनेने राजाभाऊंना आधी आमदारकी दिली आणि आता खासदारकीही दिली. आम्ही यात अत्यंत समाधानी आहोत. आम्हाला कुठेही जाण्याची अजिबात इच्छा नाही. त्या रात्री मी स्वतः मिलिंद नार्वेकरांना फोन करून 'असे लोक आले होते' अशी माहिती दिली. त्यानंतर उद्धव साहेबांचा मला फोन आला. मी साहेबांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका; आम्ही कुठेही जाणार नाही आणि शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहणार आहे."

फुटीबाबत आज सोक्षमोक्ष लागणार? वर्धापन दिनाचा 'मुहूर्त' हुकला

शिवसेना (UBT) पक्षातील कथित खासदार फुटीच्या प्रकरणाबाबत आज अखेर सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी आज संसदीय पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली असून, सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आवश्यक संख्याबळ जुळवण्यात अडचण आल्याने आणि शेवटच्या क्षणी २ खासदारांनी माघार घेतल्यामुळे ही बंडखोरी तुरतास लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून 'विप' (Whip) बजावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT