BJP workers in Solapur protest against Dilip Mane’s entry; internal rift deepens as Operation Lotus faces setback. saam tv
महाराष्ट्र

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Solapur Politics Operation Lotus: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाविरोधात कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यामुळे भाजपचा ऑपरेशन लोटस प्लॅन उलटला. देशमुख-माने संघर्ष निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झालाय.

Suprim Maskar

  • भाजप कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशाचा तीव्र विरोध केला आहे.

  • जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ऑपरेशन लोट्स

  • देशमुख-माने संघर्षामुळे भाजपच्या अंतर्गत मतभेद उघड

सोलापुरातील राजकीय भूकंपाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी भाजपमध्ये मोठ्या इनकमिंगची पटकथा रचली होती. मात्र दिवाळीपूर्वीच हा बार फुसका ठरल्याचं चित्र आहे. कारण ग्राऊंड लेव्हलला हे इनकमिंग कार्यकर्त्यांच्या पचनी पडलं नाही.

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच मोर्चा काढला. कार्यकर्त्यांचा संताप पाहता गोरेंच्या ऑपरेशन लोटसची खेळी पक्षावरच बूमरँग होत असल्याची चर्चा रंगली.

दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन चिघळल्यानंतर भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आंदोलनस्थळी दाखल झाल्या..आंदोलकांची समजूत काढत. निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं..तर दुसरीकडे हे आंदोलन स्पॉन्सर होतं, असा आरोप भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळेंनी केला.

सुभाष देशमुखांच्या या भुमिकेमुळे दिलीप मानेंसोबतचा त्यांचा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. मात्र या संघर्षामागे नेमकी काय कारणं आहेत ते पाहूयात. दिलीप माने आणि सुभाष देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकमेकांचे पारंपारिक विरोधक राहिलेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्चस्वासाठीही दोन्ही नेत्यांकडून अनेक वर्षांची लढाई सुरु आहे.

दोन्ही नेते सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते आहेत. साखर कारखाना, बँका आणि पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात दबदबा असल्यानं एकमेंकाचे प्रतिस्पर्धी आहेत. माने आणि देशमुखांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक सोसायटीवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष आहे.

दरम्यान सोलापूरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचं ऑपरेशन लोटस हे फक्त दिलीप मानेंपुरतेच मर्यादीत नाहीय. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील तसेच ठाकरे सेनेचे सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या पक्षप्रवेशासाठीही गोरेंनी तयारी सुरु केलीय.

मात्र दिलीप मानेंना विरोध पाहता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे इतर ठिकाणीही कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या भाजपमध्ये बाहेरच्याच नेत्यांची गर्दी जास्त झाली आहे. त्यामुळं जुने, निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभुमीवर ही अस्वस्थता अशीच वाढत जाणार का ? की पक्षश्रेष्ठींच वेळीच याची दखल घेणार ? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT