विकासाच्या नुसत्या घोषणा, अंबरनाथमध्ये अनधिकृत गाळ्यांचे अस्तित्व कायम Saam Tv
महाराष्ट्र

Ambernath: अंबरनाथच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे अनधिकृत गाळे कायम! पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक करतंय काय?

Ambernath Development: अंबरनाथ शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढला असून, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे गाळे उभारले असून, त्यावर अजून कारवाई केली गेलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंबरनाथ शहरात सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 'विकासाचा अंबरनाथ पॅटर्न' अशी जाहिरातबाजी करणाऱ्या प्रशासनाकडून या अनधिकृत बांधकामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, शहराच्या प्रवेशद्वारावरच पत्र्याचे अनधिकृत गाळे उभारले गेले असून, ही बाब स्थानिक माध्यमांनी तब्बल दोन महिन्यांपूर्वीच उघडकीस आणली होती. मात्र आजतागायत या गाळ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांकडे दुसऱ्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने, ते आपल्या मूळ खात्याचे काम नीटपणे पाहू शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे वाढत असून, सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अंबरनाथमधील लोकनगरी रस्त्यावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी नव्या गाळ्यांसाठी मातीचा भरावही करून ठेवलेला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने फक्त जुन्या तारखांच्या नोटीसा दिल्या आहेत. प्रत्यक्षात कुठलीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना विभागाचे दुटप्पी धोरण दिसून येते. भाजीवाले, फेरीवाले आणि फळविक्रेत्यांवर कारवाई करून केवळ दिखावा केला जातो. दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तूंवर लगेच कारवाई केली जाते. पण अनधिकृत गाळ्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातं. हे गाळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवत आहेत. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना या गाळ्यांचे संरक्षण मिळते असे वाटते. या गाळ्यांना टॅक्स पावत्या दिल्या जातात तसेच इलेक्ट्रिक कनेक्शन मिळवून देण्यासाठी मदतही केली जाते. यामुळे अतिक्रमण अधिक बळकट होत आहे.

मूळ विभाग व अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी दोघेही यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर डोळेझाक करून लाभ घेतला जातो. त्यामुळे नवीन मुख्याधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ते खरोखरच कारवाई करणार का हे पाहणे गरजेचे आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभारामुळे अंबरनाथ शहराचा चेहराच बदलत चालला आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT