Online Scam saam tv
महाराष्ट्र

Tourism Fraud: लोणावळा-कर्जत व्हिला बुकिंग घोटाळा; ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश, आरोपी पुण्यात गजाआड

Online Scam Crime: ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकाने कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली, जो डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोणावळा-कर्जतला येणाऱ्या पर्यटकांची आर्थिक फसवणूक करत होता.

Dhanshri Shintre

संजय गडदे/साम टीव्ही न्यूज

डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोणावळा कर्जतला येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याचा सायबर पथकाने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केले आहे. लोणावळा कर्जत परिसरात स्वस्तात राहण्यासाठी वीला, जलक्रीडासफरी, होमस्टे बुकिंगच्या नावे पर्यटकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई पुणे येथून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

आकाश रुपकुमार जाधवानी, (२५ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो घाटकोपर येथील राहणारा आहे. आरोपीवर मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशा प्रकारची फसवणूक किती लोकांची केली आहे याबाबतचा तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.

यमन सुरेश चटवाल हे अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात. जानेवारी महिन्यात सुट्टीनिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत खोपोली किंवा लोणावळा येथे फिरायला जायचे होते. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियावर व्हिला बुकींगसाठी सर्च केले होते. त्यात त्यांना एका व्हिलाची माहिती दिसली होती. या पेजवर एका व्हिलाची माहिती देताना त्यात साडेचौदा हजार फॉलोअर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या पेजवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरील व्यक्तीने व्हिला उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर यमन चटवाल यांनी १८ व्यक्तीसाठी तीन दिवसांसाठी व्हिला बुक केला होता.

दरम्यान, त्यासाठी त्यांना ८५ हजार रुपये सांगण्यात आले. त्यापैकी ४२ हजार ५०० रुपये त्यांनी संबंधित व्यक्तीला ऑनलाईन ट्रान्स्फर केले. काही दिवसांनी त्यांनी संबंधित वेबपेजची पाहणी केली असता त्यात त्यांना चांगली प्रतिक्रिया नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल करुन व्हिला बुकींग रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र बुकिंग रद्द केल्यानंतर दोन दिवसात पैसे परत मिळाल्यामुळे फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. आरोपीच्या मोबाईलसह ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, झोन ९चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी टीमने त्याची माहिती काढून पोलीस निरीक्षक विजय माडये, प्रशांत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत, स्वप्निल काकडे यांनी तांत्रिक माहितीवरुन पुण्यातील खरडी, चोखी धाणी परिसरातून आकाश जाधवानी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यात त्याचा सहभाग उघडकीस आला होता.

चौकशीत आकाश हा घाटकोपर येथील पंतनगर, कर्म विहारचा रहिवाशी आहे. व्हिला बुकींगच्या नावाने त्याने आतापर्यंत अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध ओशिवरा, मलबार हिल, विलेपार्ले, एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा अशा प्रकारे फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

SCROLL FOR NEXT