Onion Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Onion Price Hike: मोठी बातमी! कांद्याचे भाव गगनाला भिडले; १५ दिवसांत दर दुप्पट, कारण काय?

Onion Price Hike 30 To 50 Percent: लोकसभा निवडणूका संपताच एक मोठी बातमी समोर आली आहे. कांद्याच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

देशात आता लोकसभा निवडणूका संपल्या आहेत, परंतु सर्वसामान्यांना काही दिलासा मिळालेला नाही. निवडणुकीनंतर तरी महागाई थोड्या फार प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु महागाई वाढतच असल्याचं समोर येत आहे. मागील १५ दिवसांमध्ये कांद्याचे भाव ३० ते ५० टक्क्यांनी वाढले असल्याचं समोर आलं आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर कांदा आता रडवताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी बटाट्याच्या किमती वाढल्या (Onion Price Hike 30 To 50 Percent) होत्या. आता कांदा महागला आहे, त्यामुळे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. सध्या देशात कांद्याची आवक कमी होत आहे, मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आता कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेणं अपेक्षित आहे.

कांद्याचा भाव का वाढतोय?

मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारात येणारा कांदा हा साठ्याचा आहे. २०२३-२४ मध्ये रब्बी पिकामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती (Onion Price Hike) आहे. त्यानंतर कांद्याचा दर वाढण्याचा अंदाज त्यांना आहे. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळेच शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत.

कांद्याच्या सरासरी घाऊक किमतीत मोठी वाढ

निर्यात शुल्क सध्या ४० टक्के असल्यामुळे कांद्याची निर्यात कमी होत आहे. सरकारने निर्यात शुल्क हटवल्यास कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी कांदा साठवून ठेवले असल्याची (Onion Price) माहिती हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली आहे.

नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये कांद्याच्या सरासरी घाऊक किमतीत मोठी वाढ झाली आहे. १० जून रोजी सरासरी घाऊक दर प्रतिकिलो २६ रुपये (Onion Price News) होता. मागील महिन्यात २५ तारखेला हा दर प्रतिकिलो १७ रुपये होता. राज्यातील अनेक घाऊक बाजारात कांद्याचे दर ३० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Pune: हॉटेलमध्ये गेला, चहा अन् बन-मस्का मागवला, पहिल्याच घासात काचेचा तुकडा, पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेतील प्रकार | VIDEO

Kapil Sharma Earnings : कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो ‘इतके’ रूपये, आकडा वाचून थक्क व्हाल

CIDCO: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT