Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: एका वर्षाची समृद्धी! ५५ लाख वाहने, ४२५ कोटी महसूल; अपघात अन् मृत्यूंचा आकडा धडकी भरवणारा; स्पेशल रिपोर्ट

One Year Of Samruddhi Highway: वारंवार होणाऱ्या अपघाांमुळे चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गाला एक वर्ष पुर्ण... शिंदे- फडणवीसांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प अशी याची ओळख आहे. समृद्धीच्या वर्षपुर्तीनिमित्त वाचा खास स्पेशल रिपोर्ट...

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा| ता. १० डिसेंबर २०२३

One Year Report Card Of Samruddhi Mahamarg:

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गाला आज एक वर्ष पुर्ण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प अशी या महामार्गाची ओळख आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळेच हा महामार्ग चर्चेत राहिला. समृद्धीच्या वर्षपुर्तीनिमित्त जाणून घ्या त्याचं संपूर्ण रिपोर्ट कार्ड.

११ जिल्ह्यांमधून जाणारा ५५ हजार कोटींचा प्रकल्प..

नागपूर ते मुंबई (Nagpur to Mumbai) असा ७०१ किलोमीटरचा जागतिक दर्जाच्या असलेला हा महामार्ग ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. हा महामार्ग सध्या ६०० किलोमीटर सुरू असून शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा अजूनही निर्माणाधिन आहे.

५५ लाख वाहने धावली...

गेल्या वर्षभरात या महामार्गावरून (Samruddhi Highway) जवळपास ५५ लाख वाहने धावलीत या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४२५ कोटींचा महसूलही मिळाला. राज्याच्या ११ जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग सुरू होऊन एक वर्षे पुर्ण झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातामुळे चर्चेत..

समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज बरोबर एक वर्ष झाले. मात्र गेल्या वर्षभरात सुरुवातीच्या काळात महामार्ग चर्चेला गेल्या तो या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे. पहिल्या सहा महिन्यात या महामार्गावर अनेक अपघात झाले. मात्र या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्ग पोलीस व परिवहन विभागाने अनेक उपाययोजना केल्यात आणि त्यामुळे गेल्या सहा महिन्यात या महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात यश..

सुरुवातीच्या काळात या महामार्गावरून वाहन चालवण्यासाठी जनजागृती नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक अपघात झाले. महामार्ग सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात या महामार्गावर ८०० च्या वर अपघात झाले तर दुसऱ्या सहा महिन्यात या महामार्गावर फक्त अडीचशे अपघात झालेले आहेत.

बुलढाणा बस अपघाताने हादरला होता महाराष्ट्र...

वर्षभरात या महामार्गावर झालेला अपघातात 140 जणांचा मृत्यू झालेला आहे. या महामार्गावर सर्वात मोठा झालेला अपघात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ झालेला खाजगी प्रवासी बसला (Buldhana Bus Accident) अपघात या अपघातात 25 प्रवाशांचा जळून हो मृत्यू झाला होता ...

महामार्गावरील कमतरता..

समृद्धी महामार्गाने विदर्भ आणि मराठवाडा परिसरात काहीशा प्रमाणात समृद्धी आली. प्रवासाचा वेळ वाचू लागला. प्रवास सुखकारक झाला. मुंबई आणि नागपूर या दोन शहरातील अंतर कमी झालं.मात्र तरीही समृद्धी महामार्गावर अजूनही अनेक उनिवा आहेत. समृद्धी महामार्गावर अद्यापही पब्लिक अमेनिटी या सुरू झालेल्या नाहीत.

पेट्रोल पंप, सुखसुविधांचा अभाव...

पेट्रोल पंप ही मर्यादितच आहेत. प्रवासासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मात्र या महामार्गावर अद्यापही तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या एक वर्षात समृद्धी महामार्गावरून जरी 55 लाख वाहनांनी प्रवास केला असला तरी मात्र जीवित हानी ही मोठी झालेली आहे त्यामुळे या महामार्गावर आता आगामी काळात अनेक भौतिक सुविधांचा अभाव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला दूर करणे अपेक्षित आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT