Solapur News: FBवर श्रद्धांजलीची पोस्ट शेअर केली, अन् पोलिसानं स्वत:वरच झाडल्या ३ गोळ्या; घटनेनं कारागृह हादरलं

Solapur Crime News: सुरूवातीला शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयात हलविण्यात आले गोळ्याझाडून घेतलेले विकास हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत.
Solapur News
Solapur NewsSaam TV
Published On

विश्वभूषण लिमये

Solapur:

सोलापूर कारागृहातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात प्रवेशद्वारावर गार्ड म्हणून सेवेत असलेल्या पोलीस (Police) कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीये. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवरच तीन गोळ्या झाडून घेतल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Solapur News
Kalyan Crime News: धक्कादायक, कोयत्याचा धाक दाखवत अल्पवयीन मुलांनी लुटली पानटपरी, दोन मुले पोलिसांच्या ताब्यात

मूळचे पुणे जिल्ह्यातील

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विकास गंगाराम कोळपे असे त्यांचे नाव आहे. सुरूवातीला शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयात हलविण्यात आले गोळ्याझाडून घेतलेले विकास हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत.

गार्ड म्हणून कार्यरत

दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली आणि ते सोलापुरातील (Solapur) जिल्हा कारागृहात आले. त्यांनी यापूर्वी २०१३ मध्ये कोल्हापूर, २०१६ येरवडा जेल पुणे,२०१७ अहमदनगर, २०१९ सांगली आणि २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कार्यरत होते.

तीन गोळ्या झाडल्या

त्यांनी स्वतःजवळील एसएलआर बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्या. विकास कोलपे यांनी स्वत:वर गोळ्याझाडून घेण्यापूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर जन्म आणि मृत्यूची तारीख टाकून भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम असे नमूद केले आहे.

वरिष्ठांचा त्रासा

यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे म्हटले आहे. दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. गोळ्याझाडून घेतलेल्या विकास यांच्यावर अतिदक्षता विभागात युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.

Solapur News
Wardha Crime News: पत्नीने दिली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार, पतीच निघाला चोर, नक्की काय होता पतीचा प्लान?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com