Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: आंदोलक ते संघर्षयोद्धा! मराठा नेते मनोज जरांगेंच्या लढ्याची वर्षपूर्ती; वाचा सामाजिक चळवळ ते राजकीय प्रवासाची A To Z स्टोरी!

Manoj Jarange Patil Protest and Political Journey: एका सामाजिक लढ्यातून तयार झालेले हे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातही महत्वाचे नाव बनले आहे. कशी झाली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरूवात? वाचा जरांगेंच्या या ऐतिहासिक प्रवासाची संपूर्ण स्टोरी...

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना, ता. २९ ऑगस्ट २०२४

मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणाचे नेते, संघर्षयोद्धा, लोकसभा निवडणुकांचे गेमचेंजर अन् आता विधानसभा निवडणुकीतही ज्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे, असे महत्वाचे नेते. एक सामान्य आंदोलक ते मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा अशी ओळख मिळवलेल्या जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. एका सामाजिक लढ्यातून तयार झालेले हे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातही महत्वाचे नाव बनले आहे. कशी झाली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरूवात? वाचा जरांगेंच्या या ऐतिहासिक प्रवासाची संपूर्ण स्टोरी...

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची वर्षपूर्ती!

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनात आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे पाटील यांनी शहागड येथील पैठण फाटा येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन देखील केलं होते. मोर्चा आटपून मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी उपोषणावेळी पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे ह्या आंदोलनाचे लोन राज्यभरात पसरून अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली.

जालन्यात लाठीचार्ज अन् राज्यभरात उद्रेक

या लाठीचार्ज झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी थेट आंतरवाली सराटीत येत मनोज जरांगे यांची भेट देखील घेतल्या होत्या. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आपला लढा तीव्र केला. या मागण्या मान्य झाल्या नसल्या तरी या आंदोलनामुळे महाराष्ट्रात 57 लाख कुणबी प्रमाणपत्र निघाले असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचं देखील त्यांनी जाहिर केले आहे.

मनोज जरांगेच्या सामाजिक ते राजकीय प्रवासाला सुरूवात!

गेल्या वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण अस्त्र उगारत राज्य सरकारला धारेवर धरले. मनोज जरांगे पाटील यांच्या शेकडो एकरात झालेल्या सभा, दौरे, लाखोंच्या गर्दीत विराट रॅली अन् राजकीय डावपेच सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. या काळात जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा, दौरे, बैठकांचा धडाका लागला होता जो आजपर्यंत सुरू आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे महत्वाचे टप्पे!

29 ऑगस्ट- जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले

1 सप्टेंबर - जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील नेते,संघटना यांनी मनोज जरांगे यांना भेटी दिल्या.

14 सप्टेंबर - मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिलं उपोषण सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन स्थगित केले.

दुसरे उपोषण

25 ऑक्टोबर - सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळं पुन्हा मनोज जरांगे उपोषणाला बसले.

30 ऑक्टोबर - माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली.

02 नोव्हेंबर - न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मनोज यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत देऊन उपोषण स्थगित केले.

जरांगेंचा मुंबई मार्च

20 जानेवारी - मनोज जरांगे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले...

26 जानेवारी  - मुख्यमंत्र्यांनी सगे सोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगें पुन्हा अंतरवाली पोहोचले...

तिसरे उपोषण

10 फेब्रुवारी - मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषणाला बसले

20 फेब्रुवारी - विधान सभेचे विशेष अधिवेशन मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर झाले.

25 फेब्रुवारी - उपोषणा दरम्यान मनोज जरांगे मुंबईतील सागर बंगल्या निघाले.जरांगेंना पोलिसांनी भांबेरी गावात रोखलं.

26 फेब्रुवारी -17 व्या दिवशी मनोज धनंजय अंतरवाली सराटीतील महिलांच्या हस्ते सरबत पिवून उपोषण सोडल.

चौथ उपोषण

8 जून : सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्या आमरण उपोषणाला सुरुवात केली.

13 जुन: राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी 13 जुलै पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी चौथ आमरण उपोषण स्थगित केलं.

पाचवे उपोषण

20 जुलै: सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह राज्यातील गुन्हे सरसकट मागे घ्यावे या मागणीसाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले..

24 जुलै: गावातील महिलांच्या हस्ते उपोषण सोडलं

१४ ऑक्टोबरची ऐतिहासिक सभा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढ्यादरम्यान १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी गावाच्या शिवारात सभा घेतली. जरांगे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अंतरवाली सराटी गावच्या शिवारात मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली ही विराट सभा शासनाच्या मनात धडकी भरवणारी ठरली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT